रायगड : आमच्यासाठी सत्ता हे सेवेचे साधन आहे. काम करताना चूक झाली तरी बेईमानी होणार नाही. प्रामाणिकपणे काम करत राज्याला सर्वोच्च शिखरावर नेण्याचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ते रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
पुढील 10 ते 15 वर्षे विरोधी पक्ष सरकारमध्ये येण्याची शक्यता नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम आज कर्जत येथे आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत देवेंद्र साटम यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळेस बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली.
“15 वर्षे या राज्यातील सरकारने लूट केली असून राष्ट्रवादी काँग्रेसची 'जल बिन मच्छली' अशी अवस्था झाली आहे. 'हल्लाबोल यात्रे'सारख्या यात्रांची सवय ठेवणे गरजेचे असून पुढील 10 ते 15 वर्षे त्यांना सरकारमध्ये येण्याची शक्यता नाही. 15 वर्षे केलेल्या पापाचे भोग भोगावे लागणार आहेत.”, असे मुख्यमंत्री म्हणाले.
त्याचबरोबर, शेतकऱ्यांसाठी हमीभाव तयार करताना उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
एमएमआरडीएचा विस्तार हा प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात होणार असून या प्रगतीला साथ देण्याचं काम राज्य सरकार करीत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर जिल्ह्यातील सर्व कामांना चालना देण्याचं काम राज्य सरकार मार्फत करण्यात येणार असून पेण अर्बन बँकेच्या नैनामध्ये येणाऱ्या जमिनी संपादन करुन पैसे फेडून बँकेला देऊन खातेदाराचे पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.
काम करताना चूक होईल, पण बेईमानी नाही : फडणवीस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Feb 2018 11:02 PM (IST)
शेतकऱ्यांसाठी हमीभाव तयार करताना उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -