मुंबई : भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या मुलाने मला भेटण्यासाठी मेसेज केला, पाचव्या मिनिटाला मी त्याला रिप्लाय करुन भेटायला बोलावलं, वनगा कुटुंबियांनी भाजपवर केलेल्या आरोपांनंतर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.


वनगा कुटुंबियांचा गैरसमज झाला आहे. चिंतामण वनगा हे भाजपचे वरिष्ठ नेते होते, त्यांच्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल सहानभूती आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीच्या दरम्यान वनगा कुटुंबियांना तिकीट द्यायचा आमचा निर्णय होता. मी स्वतः 27-28 तारखेला उद्धव ठाकरेंना फोनवर सांगितलं होतं, की आम्ही त्यांना तिकीट देणार आहोत, मदत करा. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते कुटुंबातील व्यक्ती असेल तर निर्णय करु, असंही मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं आहे.

त्यानंतर 1 तारखेला सुभाष देसाई यांच्यासोबतही चर्चा झाली त्यावेळी ते म्हणाले होते की चांगला निर्णय करु, मात्र 3 तारखेला आम्हाला पण टीव्हीवर पाहायला मिळालं.

आमचे अनेक लोक वनगा कुटुंबियांच्या संपर्कात होते, तरीही त्यांना गैरसमज का झाला? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. लोकल राजकारणात काही लोकांनी त्यांचा तसा समज करुन दिला असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

वनगा यांची पुण्याई मोठी आहे. त्यांनी भाजप पक्ष मोठा केला. भाजपचे नेते चिंतामण वनगा त्यांच्या निधनांनंतर जागा रिक्त झाली, भाजपला नुकसान होईल असं वनगा कुटुंबीय वागणार नाही असं मला वाटतं असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.