Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 जुलै 2021 | बुधवार | ABP Majha

  1. दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन, मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास

 

  1. मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता; महाराष्ट्रातून नारायण राणे आणि कपिल पाटील राजाधानी दिल्लीत

 

  1. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात ओबीसी आणि महिला वर्गाचं प्रतिनिधीत्व वाढवण्याचा प्रयत्न; अनुभवी आणि तरुणांना मिळणार संधी, नव्या मंत्रालयाचीही स्थापना

 

  1. विधानसभेत जे काही घडलं, हे कितीही कुणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य

 

  1. पवार आणि थोरात यांच्यामध्ये बसलेलो असताना बाहेर कसा निघू; भाजपसोबतच्या युतीच्या चर्चांना उद्धव ठाकरेंकडून पूर्णविराम

 

  1. जेईई मेन 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर; तिसऱ्या सेशनची परीक्षा 20 ते 25 जुलैला तर चौथ्या सेशन ची परीक्षा 27 ते 2 ऑगस्टला होणार

 

  1. भिमा-कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना तात्काळ जामीन द्या, स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यासह विरोधकांचं राष्ट्रपतींना पत्र

 

  1. कोरोनामुळे GST कलेक्शनमध्ये घट, जून महिन्यात 92 हजार 849 कोटींची वसुली

 

  1. राज्यात सोमवारी 10 हजार 548 रुग्णांना डिस्चार्ज, तर 8 हजार 418 रुग्णांची भर; 32 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद नाही

 

10. एकाच दिवशी 10 गरजू रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया; मुंबईतील कोहिनूर रूग्णालयात चॅरिटेबल ट्रस्टचा अभिनव उपक्रम