पुणे : दौंड पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापरू करून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर 29 लाखांचा झालेला सिनेस्टाईल दरोडा उघड केला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड मध्ये पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा वापरून दरोड्यातील आरोपींना पकडण्यात यश आले आहे. 29 ऑगस्टला महामार्गावर दुचाकी गाड्यावर येऊन रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या टेम्पो ड्रायव्हरकडून 29 लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले होते. त्यानंतर दौंड पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेला चोरीचा संदेश दिला असता त्याच दिवशी ग्रामसुरक्षामुळे एका आरोपीस अटक करण्यास मदत झाली होती. यानंतर या घटनेचे गांभीर्य ओळखत अधिक तपास करीत गुन्ह्यातील पाच जणांना अटक केलीय तर एकाच नंबरच्या दोन पल्सर तर नंबर नसलेली एक दुचाकी जप्त केल्या आहेत


पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद गावच्या हद्दीमध्ये पुण्याहून सोलापूरच्या दिशेने पोल्ट्रीचे खाद्य आणण्यासाठी निघालेल्या टेम्पोचा ड्रायव्हर लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबला असता. हत्यारबंद चोरट्यांनी दुचाकी गाड्यावर येऊन चालकास लुटून त्याच्याकडील 29 लाखांची रोकड लुटून पळ काढला होता,ही बाब दौंड पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांना समजताच त्यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेला चोरीचा संदेश दिला. या संदेशाद्वारे ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत एकाच वेळी साठ हजार लोकांपर्यंत पोहचला आणि याचवेळी पाटस टोल नाकाकडून बारामती मार्गाकडे जाणाऱ्या एका नागरिकांनी हा संदेश ऐकला.


संदेशात ऐकल्याप्रमाणे त्याच वर्णनाची मोटारसायकल दिसल्याने तिचा पाठलाग केला असता, अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी मोटारसायकल तिथेच सोडून शेजराच्या शेतात पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच जागेवर पाहणी केली असता याठिकाणी 8 लाख 28 हजार इतकी रक्कम बॅगेमध्ये मध्ये मिळाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी अधिक तपास केला असता पाटस पोलिसांनी एक आणि नंतर चार आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले. ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे आरोपी पकडण्यास व ही घटना उघडकीस येण्याचे पुणे जिल्ह्यातील पहिलाच प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाल्याचे दौंड पोलिसांना यश आले.