चिपळूण : चिपळुणमध्ये 22 जुलैला महापूर आला आणि होत्याचे नव्हते झाले. नागरिक, व्यापारी यांचे अतोनात नुकसान झाले. जवळपास चौदा रुग्णांचा यात बळी गेला. चिपळुणात आलेला महापूर हा मानवनिर्मित असून यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी चिपळूण येथील वकील ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे.


ही याचिका दाखल करताना ओवेस पेचकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने अनेक मुद्दे मांडले आहेत. 2005 मध्ये चिपळूण परिसरात 300 मिलिमीटर पाऊस झाला. 2021 मध्ये केवळ 202 मिलिमीटर पाऊस चिपळूण परिसरात झाला. 2005 च्या तुलनेत कमी पाऊस असतानाही चिपळूणमध्ये महापूर आला. कोयना, नवजा, महाबळेश्वर या सह्याद्रीच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.


चिपळुणात 21 जुलै रोजी 97 तर 22 जुलै रोजी 202 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र कोळकेवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे चिपळुणात महापूर आला असे मुख्य कारण त्यांनी या याचिकेत नमूद केले आहे. 2005 ला महापूर आला, तेव्हा नगरपालिकेने नागरिकांना सतर्क केले. परंतु या वर्षी 22 जुलै रोजी मध्यरात्री ते 23 जुलै पाऊस पडून महापूर आला.


शहरात पाणी भरायला लागल्यानंतर नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना नागरिकांना दिली नाही. भोंगा वाजवला गेला नाही, शिवाय महापुरामुळे आलेल्या आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी व अन्य आपत्कालीन यंत्रणा कुठेही दिसून आली नाही. महापूर येत असताना पूर्वसूचना देणे व त्यानंतर आपत्कालीन यंत्रणा सक्षमपणे राबवण्यात चिपळूण नगरपालिका पूर्णपणे अपयशी ठरली. मोठ्या प्रमाणात हा महापूर आला याचा फटका वाशिष्ठी पुलालाही बसला असल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.


महत्वाच्या बातम्या :