मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज (मंगळवार) पुन्हा एकदा राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. रात्री  आठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपलं म्हणणं राज्यातील जनतेसमोर मांडणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री नेमक्या काय घोषणा करणार? याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावेळी मुख्यमंत्री  लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.  दरम्यान मुख्यमंत्री या घोषणा करण्याची शक्यता आहे. 


वाईन शॉप्स, किराणा माल आणि भाजीपाला सुरु राहणार 


सामन्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून घरपोच मद्य सेवा सुरु ठेवण्यात येईल, तसेच किरणा आणि भाजीपाला कोरोनाच्या नियमाचं पालन करून सुरु ठेवण्यात येईल. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरचा भार हलका होण्यास मदत होईल मद्य विक्रीतून राज्याला मिळणारं उत्पन्न मोठं आहे. राज्याला वर्षातून  20 हजार कोटी इतकं आहेत आहे .त्यामुळेच मागच्या लॉकडाऊनमध्ये वाईन शॉप्स बंद करण्याचा जो निर्णय घेतला होता तो यंदा घेणार नाही अशी शक्यता आहे 


अत्यावश्यक कर्मचा-यांसाठी वाहतूक


रेल्वे, बस, एस टीचा वापर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी त्या व्यतिरिक्त रस्त्यावर कोणालाही फिरता येणार नाही. आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि पलिका कमर्चारी  राज्यातल्या विविध भागात तैनात करण्यात येणार आहेत.  रुग्ण संख्या कमी करण्यासाठी तातडीनं मदत पोहचवतील


लॉकडाऊनमध्ये बेड्सची संख्या वाढणार 


सध्या वेटिंलेटर, ॲाक्सिजन आणि बेड्स उपलब्ध नाहीत. महाराष्ट्रात जिल्हानिहाय हे बेड्सचं वाढवले जातील  तर मुंबईत वॉर्डसप्रमाणे बेड्स आणि आयसीयू बेड्स पुढच्या दोन ते तीन दिवसांत वाढवले जाऊ शकतात  मुंबईतल्या प्रत्येक वॉडर्स मध्ये साधारणत: हजार बेड्स आणि जम्बो कोव्हिड सेंटर सुरु ठेवण्यावर भर आहे


सीमा बंद, पोलिस तैनात


राज्यात जिल्हा पातळीवरच्या सीमा पुन्हा एकदा बंद केल्या जाण्याच्या शक्यता आहे. ज्यांना गावाला किंवा दुस-या शहरात अतिमहत्वाच्या कामा व्यतिरिक्त जाता येणार नाही. जर दुस-या भागात जायचं असेल तर पुन्हा एकदा पोलिसांची परवानगी घ्यावी लागण्याची शक्यता आहे  तसेच मुंबई, उपनगर आणि इतर आसपासच्या शहरांच्या वेशीवर पोलीस दिवसरात्र तैनात करण्यात येऊ शकतात. भाजीपाला, दुध, फळं, आरोग्य सेवकांच्या वाहनांना परवानगी असणार त्या व्यतिरक्त सापडल्यास कारवाई होणार 


लसीकरणासाठी घरपोच सेवा 


एकीकडे लॉकडाऊन होत असताना विविध पालिकांचे कर्मचारी दिवस रात्र काम करणार आहेत.  त्यामध्ये पालिकेतच्या रुग्णालयात जास्तीत जास्त लोकांना लस देण्यावर सरकारचा भर असेल, नागरिकांना घरातून ते रुग्णालयापर्यत घेऊन जावून लस देऊन पुन्हा घरी सोडण्याचा विचार सरकार करतंय 


विमान सेवा सुरूच राहणार 


विदेशातून आणि इतर राज्यातून येणा-या प्रवाशांना चाचणी अनिवार्य असेल तसेच 7 ते 14 दिवासांचा क्वारंटाईन कालावधी कायम राहिल तसेच इतर राज्यात किंवा परदेशात जायचं असेल तर इकडून सुद्धा चाचणी करूनच जावं लागणार आहे.