Bhandara News भंडारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज भंडारा जिल्ह्याच्या (Bhandara News) दौऱ्यावर असून ते आज वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. दरम्यान, वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं आज त्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले आहे. त्यानंतर शहरातील रेल्वे मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा होत आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्प जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देणारा असून अनेक रोजगाराच्या संधी ही निर्माण करणारा ठरणार आहे.
त्यामुळे या महत्वकांशी प्रकल्पाची साऱ्यांनाच प्रतीक्षा लागली आहे. अशातच भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटर होत असलेला जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प हा भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी माईल स्टोन ठरणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी बोलताना व्यक्त केला आहे.
भंडाऱ्याचा विकासासाठी जल पर्यटन प्रकल्प माईल स्टोन ठरणार
भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या माध्यमातून या सभेचं आणि या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि जलसंपदा विभागाच्या वतीने संयुक्तरित्या या महत्वकांशी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले. दरम्यान 102 कोटीच्या खर्चातून होत असलेल्या या प्रकल्पामुळे पुढील टप्प्यांत मोठ्या प्रमाणात उद्योगनिर्मिती होणार आहे. या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण नागरिकांचे ही जीवनमान उंचावणार आहे. जागतिक दर्जाचा इथे जलपर्यटन होत असल्यानं भंडारा जागतिक नकाशावर पोहचणार आहे. तसेच सुमारे दहा हजार लोकांना या निमित्याने रोजगारची नवी संधी निर्माण होणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी बोलताना व्यक्त केलाय.
मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रेसने दाखविले काळे झेंडे
दरम्यान, भंडाऱ्यातील या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला स्थानिकांचा विरोध होताना देखील बघायला मिळाले आहे. गोशीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना मागील दोन वर्षापासून मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. मात्र अद्याप भेट देत नसल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्तांनी आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपल्या मागण्यांना घेऊन या प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेत पोलीस व्हॅन मध्ये कोंबून नेलं. हा सर्व प्रकार भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेदरम्यान घडला.
तर दुसरीकडे जागतिक जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा सभा स्थळाकडे जात असताना युवक काँग्रेसने त्यांना काळे झेंडे दाखविले. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात हे काळे झेंडे दाखविण्यात आले. यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांच्यासह काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
इतर महत्वाच्या बातम्या