मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा अंतरिम आढावा घेण्यात आला. आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामाचा यामध्ये आढावा घेण्यात आला. 7 जानेवारी ते 16 एप्रिल 2025 या कालावधीत जी कामं झाली त्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला मंत्रालय सचिवांपासून ते क्षेत्रीय अधिकाऱ्यांपर्यंत 6854 अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. ऑनलाईन बैठकीला सर्व स्तरातील इतके अधिकारी उपस्थित असण्याचा हा एक विक्रम, तालुका स्तरापर्यंत अधिकाऱ्यांचीही यावेळी उपस्थिती होती.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या आहेत. नावीन्यपूर्ण उपक्रमांची यादी तयार करा, त्या इतरांनाही सांगा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. गुंतवणूक येत असताना गुड गव्हर्नन्स द्या, संपूर्ण कालावधीचा आढावा आल्यानंतर 1 मे रोजी याचा सार्वजनिक कार्यक्रम करु असेही फडणवीस म्हणाले. संकेतस्थळे फुलप्रूफ करा. दरम्यान, यावेळी लक्षणीय कामगिरी करणाऱ्या 15 अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.
15 अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र
पालघर पोलिस अधीक्षक : बाळासाहेब पाटीलसातारा पोलिस अधीक्षक : समीर अस्लाम शेखसंभाजीनगर आयजी : वीरेंद्र मिश्रामुंबई पोलिस आयुक्त : विवेक फणसाळकरगृह, अतिरिक्त मुख्य सचिव: इकबालसिंग चहलआयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका: शेखर सिंगआयुक्त, ठाणे महापालिका: सौरभ रावमुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे, जिप: विशाल नारवाडेमुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर, जिप: विवेक जॉन्सनजिल्हाधिकारी, नागपूर: विपीन इटनकरजिल्हाधिकारी, जळगाव: आयुष प्रसादविभागीय आयुक्त, पुणे: डॉ. पुलकुंडवारआदिवासी आयुक्त: लिना बनसोडेआयुक्त वैद्यकीय शिक्षण: राजीव निवतकरसचिव, मृद व जलसंधारण: गणेश पाटील
सत्तेत आल्यानंतर प्रत्येक खात्याला 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते
महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर फडणवीस यांनी प्रत्येक खात्याला 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. या आराखड्यात लोक केंद्रीत योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना, राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावा, असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 100 दिवसांच्या आराखड्यातून विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच सरकारी योजनांची योग्य अंमलबजावणी करावी अशा सूचना देखील फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या आहेत.