Beed Police News : बीडच्या पोलिस दलात (Beed Police) एक मोठा बदल करण्यात आला आहे. पोलिसांना (Police) पूर्ण नावाऐवजी आता केवळ पहिल्या नावाची नेमप्लेट (Nameplate) असणार आहे. पोलीस दलातील जातिवाद नष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी संकल्पना समोर आणली आहे. 1 मार्चपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
बीड पोलिसांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा प्रयत्न सुरू आहे. बीडच्या पोलिस दलात आडनावा ऐवजी पहिल्या नावाने बोलावण्याचा आदेश काढला होता. आता एक पाऊल पुढे टाकत प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या टेबलवर पहिल्या नावाची नेमप्लेट असणार आहे. याची अंमलबजावणी एक मार्च पासून केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील जातिवाद समोर आला. पोलीस दलात देखील हा जातीवाद असल्याचं वारंवार बोलंले गेलं. त्यानंतर सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलिसांची प्रतिमा डागाळली. हीच प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे पावलं उचलत आहेत.
आडनावांमुळं अधिकारी कर्मचाऱ्यांची जात लक्षात येते
आडनावा मुळे अधिकारी कर्मचाऱ्यांची जात लक्षात येते. त्यामुळे आडनावा ऐवजी पहिल्या नावाने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलाविण्याचा आदेश काढला गेला. या आदेशाची अंमलबजावणी म्हणून पोलीस ठाण्यातील टेबलवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पहिल्या नावाचा उल्लेख असणार आहे. आणि याची अंमलबजावणी एक मार्चपासून केली जाणार आहे.
पोलीस यंत्रणा आरोपींची पाठराखण का करत आहे? ज्ञानेश्वरी मुंडेंचा सवाल
परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आह. यावर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत. माझ्या पतीच्या हत्याप्रकरणी मला न्याय पाहिजे आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार सुरेश धस यांनी आमच्या परिवारासाठी पुढे येऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिले आहे. राजकारण सोडून ते आम्हाला साथ देत असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटले आहे. मी माझ्या उपोषणावर ठाम असून तूर्तास पोलीस यंत्रणेला वेळ दिला आहे. आरोपी अटक केले तर ठीक नाहीतर उपोषणावर ठाम आहे. आमची दिशाभूल होत आहे. माझ्या पतीच्या हत्या प्रकरणात आम्ही न्याय मागत आहोत. आरोपींचे आणि पोलिसांचे सीडीआर काढण्याची मागणी आम्ही करत असून पोलीस यंत्रणा आरोपींची पाठराखण का करत आहे? असा सवाल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या: