Shiv Jayanti 2022 : शिवजयंतीला (Shiv Jayanti) काही तास शिल्लक राहिले असून महाराजांच्या जन्मदिनाची (Shiv Jayanti 2022) राज्यभरातील शिवभक्त (ShivBhakt) आतुरतेने वाट पाहत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नंदुरबारच्या शहादा येथील वैष्णवी पाटील या तरुणीने एका वेगळ्या प्रकारे महाराजांना अभिवादन केलं आहे. तिने शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील एका हॉलमध्ये जवळपास पाच हजार स्क्वेअर फूट जागेवर रांगोळीच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटले आहे.
या कलाकृती साठी या विद्यार्थिनीला पाच ते सहा क्विंंटल रांगोळी लागली आहे. इतक्या प्रचंड रांगोळीतून तिने साकारलेली ही भव्य प्रतिमाही तितकीच भव्य आहे. विशेष म्हणजे मागील चार दिवसांपासून म्हणजेच जवळपास 96 तास या रांगोळीवर काम करत असून तिने अखेर अपार मेहनतीनंतर ही रांगोळी पूर्ण केली आहे. शहादा येथे पहिल्यांदा इतकी मोठी रांगोळी साकरण्यात आली आहे. दरम्यान महाराजांची ही नयनरम्य आणि भव्य रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील शिवप्रेमी या ठिकाणी हजेरी लावत आहेत. वैष्णवी पाटील ही अभ्यासतही हुशार असून सध्या ती बी फार्मसीचं शिक्षण घेत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची 392 वी शिवजयंती
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इंग्रजी कॅलेंडरनुसार 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्याच्या शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. त्यामुळे यंदाची ही महाराजांची 392 वी शिवजयंती असणार आहे. मागील दोन वर्ष कोरोनाचा प्रभाव असल्याने शिवजयंती निर्बंधाखाली होती. पण यंदा रुग्णसंख्या काहीशी आटोक्यात असल्याने शिवजयंती काही प्रमाणात नक्कीच साजरी होईल. त्यामुळे सर्व शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
हे ही वाचा-
- Shiv Jayanti 2022 : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे? माहिती आहे का? पहिल्या पुतळ्याच्या निर्मितीची रंजक कहाणी
- Shiv Jayanti 2022 : शिवस्मारक आपल्या खासगी जागेत उभारा, अनधिकृतपणे पुतळा बसविणाऱ्यांना पुरुषोत्तम खेडेकर यांनी ठणकावलं
- Ser Sivraj Hai : ‘शिवजयंती’निमित्ताने खास भेट, महाराजांच्या वैशिष्ट्यांचे गुणगान करणारे 'सेर सिवराज है' रसिकांच्या भेटीला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha