Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : रायगडावर केलेली लायटिंग उत्साही लोकांचा अजाणतेपणा, हे घडणं चुकीचं- अजित पवार

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह आहे. उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केलं जात आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Feb 2021 12:04 PM
छत्रपती शिवाजी महाराज यांना सोलापुरात मुस्लिम महिलांनी अभिवादन केलं. महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेड यांच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जयंती उत्सवावर निर्बंध घातल्याने ही शोभायात्रा रद्द करण्यात आली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महिलांनी एकत्रित येऊन अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी नव्हते तसेच त्यांच्या काळात महिलांचा प्रचंड आदर केला जात होता. ही भावना समाजात रुजावी यासाठी मुस्लिम महिलांनी एकत्रित येऊन महाराजांना अभिवादन केल्याचे मत महिलांनी यावेळी व्यक्त केले.
शिवजयंती जोमाने साजरी करावी यात दुमत नाही. पण सध्या कोरोना पुन्हा कहर माजवू लागलाय. मंत्र्यांना ही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे शिवजयंती सारखे उत्सव नाईलाजाने थोडक्यात घ्यावे लागतायेत. शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी देखील मावळ्यांचा जीव धोक्यात घालणारा निर्णय कदापि घेतला नसता, असं अजित पवार म्हणाले. शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे कैवारी होते, ते शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घ्यायचे, असंही अजित पवार म्हणाले.
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे या परिसराला अक्षरश: पोलिस छावणीचे रुप प्राप्त झाले आहे. याच मुद्यावरुन भाजपचे आमदार माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यसरकावर निशाणा साधला. राज्यसरकारने लावलेले निर्बंध पाहून खेद वाटतो. अनेक कार्यक्रम होत असतात मात्र जयंतीवर सरकाने निर्बंध लावून शिवप्रेमींवर अन्याय केला आहे. शिवप्रेमींनी एकत्रित येऊ नये, महाराजांवर असलेले प्रेम देखील व्यक्त करु द्यायचे नाही अशी सरकारची भावना असावी. अशी टिका भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी केली.
शिवराज्याभिषेक सोहळ्यादिनी विद्यापीठात घुमणार जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष
प्रत्येक महाविद्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत
शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री आदित्य ठाकरेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, माझं हे दुसरं वर्ष आहे. हा बहुमान जिजाऊ, शिवाजी महाराज आणि तुमच्यामुळं लाभलेलं आहे. आता कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु आहे. या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, महाराष्ट्राचा इतिहास जगभरात पोहचवायचा असेल तर मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना रायगडशी जोडलं गेलं पाहिजे. हे सी फोर्ट सर्किट टूरिझम म्हणजे जलदुर्गाच्या माध्यमातून जोडायला हवं. मुंबईतून समुद्रामार्गे रायगडला निघताना खांदेरी, उंदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, मुरुड जंजीरा हे किल्ले येतात. तिथून काही किलोमीटरवर रायगड किल्ला येतो. त्यामुळे हे किल्ले एकमेकांना समुद्रामार्गे जोडले तर पर्यटक वाढतील, शिवरायांचा इतिहास जगभर पोहचेल.

शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री आदित्य ठाकरेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, माझं हे दुसरं वर्ष आहे. हा बहुमान जिजाऊ, शिवाजी महाराज आणि तुमच्यामुळं लाभलेलं आहे. आता कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु आहे. या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महाराजांच्या काळातील युद्ध आपल्याला करावे लागत नसले तरी कोरोनाशी आपलं युद्ध सुरू आहे. यासाठी आपली ढाल म्हणजे मास्क आहे. नुसती तलवार हातात घेतली म्हणजे युद्ध जिंकता येत नाही - मुख्यमंत्री ठाकरे
महाराजांच्या काळातील युद्ध आपल्याला करावे लागत नसले तरी कोरोनाशी आपलं युद्ध सुरू आहे. यासाठी आपली ढाल म्हणजे मास्क आहे. नुसती तलवार हातात घेतली म्हणजे युद्ध जिंकता येत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर त्यांनी देखील मावळ्यांचा जीव धोक्यात घालणारा निर्णय कदापि घेतला नसता. महाराज हे शेतकऱ्यांचे कैवारी होते, ते शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घ्यायचे : उपमुख्यमंत्री अजित पवार
शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री आदित्य ठाकरेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, माझं हे दुसरं वर्ष आहे. हा बहुमान जिजाऊ, शिवाजी महाराज आणि तुमच्यामुळं लाभलेलं आहे. आता कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु आहे. या युद्धात मास्क हीच आपली ढाल आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
दरवर्षी महाराजांना अभिवादन करण्यासाठी या परिसरात हजारो लोक येत असतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या जयंतीवर निर्बंध
शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित, पोलिसांकडून दिली मानवंदना
कोल्हापुरातील शिव मंदिरात शाहू महाराजांच्या उपस्थित छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा, मालोजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव यशराज यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा सुरू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांचं शिवनेरीवर आगमन, ढोल ताशाच्या गजरात स्वागत, थोड्याच वेळात मुख्य कार्यक्रम
सरकारनं 100 लोकांची मर्यादा 500 पर्यंत वाढवायला हवी होती. शिवभक्तांनी कोरोना नियमांचं पालन करत आहे त्या ठिकाणांहून अभिवादन करावं, खासदार संभाजीराजे यांचं आवाहन
खासदार संभाजीराजे शिवनेरी किल्ल्यावर दाखल, शिवनेरीवर ढोलताशांचा गजर, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम, थोड्याच वेळात मुख्यमंत्री येणार
उपमुख्यमंत्री अजित पवार शिवनेरी किल्ल्यावर दाखल, शिवजयंतीनिमित्त शिवनेरी गडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन
देवेंद्र फडणवीस शिव जयंती साजरी करायला नागपुरात, नागपूरच्या शिवाजी नगर पार्कात असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं
शिव जयंती कार्यक्रमाला शिवाजी पार्कवर मंत्री अशोक चव्हाण उपस्थित, महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त चहल यांचीही उपस्थिती
पालघरच्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या आशेरी गडावर युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर कडून रात्री शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तर आजही या गडावर शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे .या अगोदर युवा शक्ती प्रतिष्ठान कडून गडाची साफसफाई आणि रंगरंगोटी करण्यात आली. यंदा प्रथमच हा शिवजयंती उत्सव आशेरी गडावर युवा शक्ती प्रतिष्ठान च्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे
शिवजयंती निमित्त शिवनेरी गड आणि जुन्नर परिसरात कलम 144 लागू करण्यात आलंय. गडावर केवळ मोजक्याच व्यक्तींना जाण्याची मुभा आहे, त्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने तसा निर्णय घेतलाय.
नाशिक शहरात रात्री बारा वाजता नाशिकरोड, पंचवटी परिसरात जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली, शिवाजी महाराजांच्या जयघोषात कुठे आरती करण्यात आली तर कुठे फटाक्यांची आतषबाजी झाली, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते
राज्यात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावरील पुतळ्याला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. त्याचसोबत फुलांची आरास देखील करण्यात आली आहे. आज मुंबई विमानतळावर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

पार्श्वभूमी

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 : छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह आहे. उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे.
जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केलं जात आहे.


 


छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण/उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा "छत्रपती शिवाजी महाराज जयंती" उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


 



छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी मार्गदर्शक सूचना


 


1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी, 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.


 



2. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

3. तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.


 



4. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात याचे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.


 



5. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या तिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे,


 



6. Covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.