Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला गळतीला सुरुवात झाली आहे. भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भाजपकडून राजू शिंदेंना पक्षात थांबवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजप नेते हरिभाऊ बागडे व अतुल सावेंची माजी उपमहापौर राजू शिंदेसोबत बैठक सुरू आहे.
7 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. भाजप नेते राजू शिंदे यांच्यासह आठ ते दहा नगरसेवक व पदाधिकारी देखील ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, कालपासून राजू शिंदे व पदाधिकाऱ्यांनी भाजप सोडून जाऊ नये, यासाठी मनधरणी सुरू आहे.
दरम्यान,आज आमदार हरिभाऊ बागडे आणि राजू शिंदे यांच्यात बैठक सुरू असून मंत्री अतुल सावे देखील या बैठकीत सहभागी झाले आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदार संघातून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात लढा देऊ शकू असा दावा करत राजू शिंदेंसह इतर नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतलाच दिसून येते..
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची भावना काय?
भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये नेमकी काय भवना आहे, याबाबत भाजपाचे नेते तथा संभाजीगरचे माजी महापौर राजू शिंदे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले पाहिजे, अशी कार्यकर्ते आणि नागरिकांची इच्छा आहे. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा आमचा विचार चालू आहे. येथे भाजपा फक्त शिंदे गटाचे काम करण्यासाठीच राहिलेली आहे, असं आम्हाला वाटत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शहरात चांगली परिस्थिती होती. पण आम्हाला ही निवडणूक लढवता आली नाही. गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून भाजपाने येथे मेहनतीने काम केलं होतं. पण ही जागा शिंदे गटाला दिली गेली. लोकसभा निवडणुकीतही आम्ही त्यांचं काम केलं. पण शिंदे गटाच्या स्थानिक आमदार, खासदारांनी भाजपाची कृतज्ञता व्यक्त केली नाही, असे राजू शिंदे यांनी सांगितले.
7 जुलैला होणार पक्षप्रवेश सोहळा
उद्धव ठाकरे देणार संभाजीनगर भाजपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. येणाऱ्या सात जुलैला भाजपाच्या अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. हा प्रवेश म्हणजे मंत्री अतुल सावे यांना मोठा राजकीय धक्का असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाठ यांची अडचण वाढणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. यातील एका नगरसेवकाने गत निवडणुकीमध्ये विधानसभा ही लढवलेली होती.
हेही वाचा: