Nanded: मुंबईसह राज्यभर मराठी अस्मितेचा आवाज उठवणाऱ्या मनसेनं आता नांदेडमध्ये ही मराठीचा दणका दाखवलाय .लघुशंकेसाठी 5 रुपये आकारणाऱ्या शौचालय चालकाला मराठी माणसांनं जाब विचारला,पण त्यानं मराठी बोलण्यास नकार  देताच मनसेनं परप्रांतीयशौचालय चालकास बेदम चोप दिलाय . नांदेडमध्ये हा सगळा प्रकार घडलाय .

नेमकं प्रकरण काय?

नांदेड शहरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानकावर एक परप्रांतीय व्यक्ती शौचालय चालवतो .या शौचालयात महिलांसह सर्वसामान्य नागरिकांकडून लघुसंखेसाठी पाच रुपये आकारले जातात .यावर एका मराठी माणसाने त्याला विचारला .त्याचा व्हिडिओ देखील काढला .शौचालय चालकाने मराठी बोलण्यास नकार दिला .  याबाबत लोकांनी बस स्थानकातील अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली मात्र त्यांनी ही प्रतिसाद दिला नाही .हा व्हिडिओ मनसे कार्यकर्त्यांकडे पाठवण्यात आला .त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी  शौचालय चालकास बेदम चोप दिला व त्याला माफी देखील मागायला लावली . या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही स्थानक व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती मात्र, यावर कुठलीही कारवाई झाली नाही .

रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय ?

नांदेड बस स्थानकाच्या शौचालय बाहेर बसणाऱ्या व्यक्तीला एका मराठी माणसाने या व्हिडिओमध्ये जाब विचारला . बाहेर बसलेला व्यक्ती लघुसंखेसाठी जाणाऱ्या लोकांकडून पाच रुपये घेत आहे . याची तक्रार नोंदवणार असल्याचं या व्यक्तीने सांगत शौचालयाबाहेर बसलेल्या व्यक्तीला  नाव विचारताच तो संतापला . जाब विचारणाऱ्या व्यक्तीशी हुज्जत घालू लागला . 'तू क्या साहेब है क्या ' असं म्हणत वाद घालू लागला .त्यावर तुम्ही मराठीत बोला असा आग्रह व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने धरताच शौचालया बाहेर बसलेल्या व्यक्तीने मराठी बोलण्यास साफ नकार दिला . हा व्हिडिओ मनसे कार्यकर्त्यांकडे पोहोचताच मनसे कार्यकर्त्यांनी बस स्टॅन्ड बाहेर असलेल्या शौचालय चालकाला बेदम चोपलं

गोकुळ झा या गुंडाला मनसैनिकांनी पकडलं

कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा आता पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. रुग्णालयातील रिसेप्शनिस्टने गोकुळ झा नावाच्या तरुणाला थांबण्यास सांगितल्याने त्याने ही मारहाण केली होती. या घटनेनंतर गोकुळ झा फरार झाला होता. आता त्याला पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणात पोलिसांनी एकूण चार जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील मुख्य आरोपी गोकुळ झा सह त्याचा भाऊ रणजीत झाला अटक करून बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मारहाण करणारा रेकॉर्डवरचा हा आरोपी 22 तासांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. शेवटी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीच त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.