Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या तीन दिवसापासून एका बिबट्याचा वावर आहे. हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असला तरी बिबट्याचा मागमूस लागत नसून नागरिकामध्ये दहशतीचे (Leopard terror) वातावरण पसरले आहे. सापळा रचूनही बिबट्या सापडत नसल्याने वनविभागाची चांगलीच धांदल उडाली असून बिबट्या नक्की गेला कुठे असा प्रश्न खुद्द वनविभागालाच पडला आहे.


छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात (Ulkanagri Area) आणि आता थेट एका मॉलच्या सीसीटीव्ही बिबट्या कैद झाला आहे. मागील तीन दिवसांपासून वनविभागाकडून 70 ते 80 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करूनही बिबट्या सापडला नसल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 


बिबट्याच्या भीतीने शाळेलाही सुट्टी


उल्कानगरी परिसरातील एका अपार्टमेंटच्या सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्याचे दर्शन घडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. शहरातील गजबजलेल्या परिसरात बिबट्या आढळून आल्याने परिसरातील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे बिबट्या आता कुठे धरून बसलाय असा वनविभागालाही प्रश्न पडल्याचे दिसतंय.


बिबट्याला पकडण्यासाठी शहरात फौजफाटा तैनात


एकीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हासह पुणे व नाशिक जिल्ह्यातील रेस्क्यू पथकेही बिबट्याचा मागवा काढण्यासाठी उल्कानगरी सह शहरातील इतर ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. जवळपास 80 ते 90 कर्मचाऱ्यांचा फौज फाटा शहरात बिबट्याला पकडण्यासाठी तैनात करण्यात आला आहे. वनविभागाने उल्कानगरी, खिवंसरा पार्क, व पोदार शाळेजवळ पिंजरे लावले आहेत. 


तीन दिवसानंतरही बिबट्याचा सुगावा लागेना


छत्रपती संभाजीनगर शहरात अनेक रहिवाशांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्याचे दर्शन घडल्यानंतर वनविभागाने सापळा रचूनही आता तीन दिवस उलटत आले आहेत. तीन दिवसानंतर ही बिबट्याचा सुगावा लागत नसून बिबट्या नक्की गेला कुठे असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.


पुण्याच्या महावितरणमध्ये बिबट्याचा वावर


आता पुणे शहरात आज चक्क बिबट्याचे दर्शन घडल्याने पुणेकरांच्या सर्वसामान्य सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी पुण्यात रानगवा आल्यामुळे पालिका प्रशासन व वन विभाग खडबडून जागे झाले होते. आता, चक्क बिबट्याने (Leopard) महावितरण कार्यालयात हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर, काहींनी बिबट्याला वाहून भुवयाही उंचावल्या होत्या. 


पुण्याच्या राजगुरुनगर येथील महावितरण कार्यालयात भरदुपारी बिबट्या शिरल्याने कार्यालयातील सर्वांचीच घाबरगुंडी झाली. विशेष म्हणजे कार्यालय कामकाज सुरू असतात बिबट्या कार्यालयात घुसल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. अनेक कर्मचारी आपलं कार्यालय सोडून बाहेर पळाल्याचं पाहायला मिळालं. येथील महावितरण कार्यालयातील मीटर टेस्टिंग विभागात महिला कर्मचारी काम करता असताना बिबट्याची एन्ट्री झाली होती. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. 


हेही वाचा:


Video : ऐ ती जंप मारील बरका... पुण्यातील महावितरण कार्यालात शिरला बिबट्या; उडाली धांदल, कर्मचाऱ्यांनी ठोकली धूम