Chh. Sambhaji Nagar Sabha Live Updates : काश्मीरची एक न एक इंच जमीन घ्या, मग आम्ही मानू; उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान
Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची जाहीर सभा होणार असून त्यासाठी महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
माझा पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला, वडीलही चोरायचा प्रयत्न केला, त्यांच्या वडिलांना काय वाटत असेल अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मोदींच्या नावे मतं मागा, मी माझ्या बापाच्या नावाने मतं मागतो, मग समजेल महाराष्ट्र कोणाच्या मागे आहे असं आव्हानही त्यांनी दिलं.
अमित शाह म्हणाले की उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा, पण जमीन दाखवायची असेल तर पाकव्याप्त काश्मीरची एक इंच जमीन घेऊन दाखवा, तर आम्ही मानू. वल्लभभाईंचा पुतळा उभा केला, देशभरातून पोलाद गोळा केले, पण त्या पोलादाचा एक कण तरी धमन्यामध्ये आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असताना भाजपला हिंदू आक्रोश करावा लागतोय हे दुर्दैवी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
या आधीही मी संभाजीनगरला आलोय, याच शहरात 1988 साली महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आली आणि शिवसेनाप्रमुखांनी या शहराचं नाव बदललं, संभाजीनगर. गेली 25 वर्षे आपण भ्रमात होतो, भाजपसोबत आपली युती होती. पण औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर झालं नव्हतं. पण महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि भाजपला जे जमलं नाही ते आम्ही करुन दाखवलं. करायचं काय नाही, नुसतं कोंबडं झुंजवत बसायचं ही भाजपची खेळी. दंगली घडवल्या जातात, त्यामुळे निवडणुका जवळ आल्याचं समजू घ्या असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजप-शिंदे सरकारची सावरकर गौरव यात्रा ही केवळ मूलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी आहे, त्यांना सावरकरांबद्दल कोणताही आदर नाही असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. तुमच्यात जर हिंमत असेल तर सावरकरांना भारतरत्न द्या असं आव्हानही त्यांनी भाजपला दिलं.
अवकाळी नुकसान,विम्याचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, या सरकारचा पायगुण चांगला नाही, हे आल्यापासून राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याचा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.
सावरकर गौरव यात्रा काढायला आमचा विरोध नाही, आम्हाला सर्व महापुरुषांबद्दल आदर, त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. पण भाजपच्या माजी राज्यपालांनी, नेत्यांनी या आधी महापुरुषांच्या विरोधात वक्तव्यं केली. शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, छत्रपतींचा अपमान होताना तुमची दातखिळी बसली होती का असा सवाल अजित पवार यांनी केला. हे शक्तीहीन सरकार असल्याचं सर्वोच्च न्यायायलाने म्हटलं. या सरकारला जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्याचा अपमान केला. मुक्तीसंग्रामच्या कार्यक्रमाला केवळ 13 मिनिटे दिली हे चुकीचं आहे असं अजित पवार म्हणाले.
आम्हाला सर्व महापुरुषांबद्दल आदर, त्यांच्यासमोर नतमस्तक आहे. पण भाजपच्या माजी राज्यपालांनी, नेत्यांनी या आधी महापुरुषांच्या विरोधात वक्तव्यं केली. शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला, छत्रपतींचा अपमान होताना तुमची दातखिळी बसली होती का असा सवाल अजित पवार यांनी केला. हे शक्तीहीन सरकार असल्याचं सर्वोच्च न्यायायलाने म्हटलं. या सरकारला जनाची नाही तर मनाची तरी वाटायला पाहिजे असंही ते म्हणाले.
जेव्हा जेव्हा राज्यावर संकट येतं, त्यावेळी मराठी माणून पेटून उठतो असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. राज्यात महाविकास सरकार असताना ते कोणत्या परिस्थिती अस्तित्वात आलं हे पटवून देण्यासाठी सभा घेणार होतो, पण मात्र आधी कोरोना आणि नंतर काही घडामोडी घडल्या आणि सभा राहिली. महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीत लढणार.
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने मराठवाड्यावर सातत्याने अन्याय केला, निर्णय वेगवान, विकास गतीमान असं हे सरकार म्हणतंय, पण 'निर्णय बेभान आणि प्रसिद्धी वेगवान' अशी स्थिती या सरकारची असल्याचं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं.
बाळासाहेब थोरात : वज्रमुठ सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मनोगत व्यक्त करताना केंद्र आणि राज्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, कोरोना काळात सर्वांत चांगल सरकार महाविकास आघाडी सरकारने हाताळलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत असताना कुटुंबातील कर्ता पुरुष बोलत आहे असे वाटायचे. हे सरकार कसं चाल्लंय सांगण्याची गरज नाही. कांद्याला भाव नाही, आम्ही आंदोलने केली. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. विरोधात बोलणाऱ्याला ईडी लावली जाते. विरोधात बोलायचं नाही अशी परिस्थिती राज्यात आणि केंद्रात आहे. महागाईवर केंद्र राज्य बोलायला तयार नाही
कोरोना काळात राज्यातील परिस्थिती महाविकास आघडीच्या सरकारने योग्य पद्धतीने हाताळले असं सांगत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, "आम्ही कांद्याला हमीभाव मिळवा म्हणून आंदोलन केले. नाफेडने अद्याप कांदा खरेदी सुरू केली नाही. सरकार विरोधी कोणी बोलले तर कारवाई केली जाते. 3 हजार 560 किलोमीटर राहुल गांधी पायी चालले यशस्वी पदयात्रा काढली. महागाई, बेरोजगारी बाबत जागृती केली. अदानी जगातील दोन नंबरचे श्रीमंत कसे झाले? राहुल गांधी परदेशात बोलले, त्यानंतर सभागृहात बोलण्याची संधी मागितली मात्र बोलू दिले नाही. अदानींच्या खात्यात 20 हजार कोटी आले कुठून याचं उत्तर सरकारने दिलं नाही."
छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमुठ सभेत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी भाजपवर हल्ला चढवला. दिल्लीश्वराला गाडायची ताकद मराठवाड्याने दाखवली असल्याचे ते म्हणाले. सभेला घाबरून भाजप शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रा सुरु असल्याचे म्हणाले. सरकारला चोर म्हटल्यास कधी सदस्यत्व जाईल याचा नेम नसल्याचे ते म्हणाले.
या राज्याला आणि देशाला जर कुणी खऱ्या अर्थाने मुर्ख बनवलं असेल तर ते भाजपच्या कमळाने बनवलं अशी टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली.
आजची सभा होऊ नये यासाठी पोलिसांवर नागपूरचा दबाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. शिवसेना फोडण्याचं काम फडणवीसांनी केलं असल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलं. सावरकरांना भारतरत्न देत नाही, पण त्यांच्या नावाने यात्रा काढता असा आरोप त्यांनी शिंदे-फडणवीसांवर केला.
आजची सभा होऊ नये यासाठी पोलिसांवर नागपूरचा दबाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. शिवसेना फोडण्याचं काम फडणवीसांनी केलं असल्याचं तानाजी सावंत यांनी सांगितलं. सावरकरांना भारतरत्न देत नाही, पण त्यांच्या नावाने यात्रा काढता असा आरोप त्यांनी शिंदे-फडणवीसांवर केला.
Maha Vikas Aghadi : सभेच्या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरवात झाली असून, कार्यकर्त्यांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळत आहे. तर शेतकरी, अवकाळी पाऊस, नुकसान भरपाई, पीकविमा योजनाबाबत सरकार काहीच बोलत नसल्याने, आजच्या सभेत या विषयाचा समाचार घ्यावा अशी या अपेक्षा नागरीक व्यक्त करत आहेत.
Ambadas Danve : आज सावरकर यांची जयंती किंवा पुण्यतिथी काहीही नाही, तरीही गौरव यात्रा का काढत आहेत. इमितीयाज जलील भाजप, शिवसेना शिंदे गटाला गँगस्टर म्हटले त्यात काही चूक नाही योग्य बोलले आहे. तर आजच्या सभेत देशाच्या विविध मुद्यावर नेते बोलतील आणि एक इंच ही जागा मैदानात उरणार नाही एवढी गर्दी होणार असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. सावरकर यात्रा म्हणजे भाजप शिंदे गटाची नौटंकी आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सावरकर यात्रेवरून भाजप आणि शिंदे गटाला टोला लगावला आहे. ती सावरकर गौरव यात्रा नसून ती अदानी बचाव यात्रा आहे. ज्यांना अदानीवर प्रश्न विचारतील अशी भीती वाटते, त्यासाठी त्यांनी सावरकर गौरव यात्रा काढली आहे. त्यांना खरंच सावरकरांबद्दल प्रेम, असेल तर नाशिकमधील भगूर येथे भाजपने काय दिवे लावलेत? भगूरमध्ये का स्मारक का उभारले नाही? अशी विचारणा केली.
Sushma Andhare : महाविकास आघाडीच्या सभेसाठी सुषमा अंधारे छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल. यावेळी भाजप-शिंदे गटावर केली टीका." सावरकर गौरव यात्रा नसून ती आदानी बचाव यात्रा आहे. ज्यांना आदानी वरती प्रश्न विचारतील अशी भीती वाटते त्यासाठी त्यांनी सावरकर गौरव यात्रा काढली आहे. त्यांना खरंच सावरकरांबद्दल प्रेम असेल तर नाशिक मधील भगूर येथे भाजपने काय दिवे लावलेत. भगूर मध्ये का स्मारक उभारले नाही? असाप्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला.
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगरमध्ये महाविकास आघाडीच्या सभेसाठी आणि भाजपच्या सावरकर गौरव यात्रेसाठी पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात केला असल्याची माहिती पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. सोबतच सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेरा द्वारे सुद्धा या दोन्ही कार्यक्रमांवर नजर ठेवणार आहे. शहरात शांतता आहे आणि दोन्ही आयोजकांनी गोंधळ होणार नाही याची हमी आम्हाला दिली असल्याचा निखिल गुप्ता यांनी सांगितलं
पार्श्वभूमी
Chhatrapati Sambhaji Nagar Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha : छत्रपती संभाजीनरगमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे. आजच्या या सभेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आघाडीचे नेते पदाधिकारी उपस्थित असणार आहे. दोन दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
आजच्या या सभेला परवानगी देताना पोलिस प्रशासनाने काही अटी घालून दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामध्ये कार्यक्रमाच्या वेळेत आणि ठिकाणात कोणत्याही प्रकारचा बदल करु नये, कार्यक्रमाचे वेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावी, सभेला येताना आणि परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करणार नाही याची दक्षता घ्यावी. सभास्थानी कमाल मर्यादेपेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करु नये, यासह अन्य अटीवर सभेला पोलिसांनी परवानगी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, संभाजीनगरमध्ये सध्या तणावग्रस्त वातावरणान आहे. त्यामुळं या सभेवेळी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फैजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील तणावग्रस्त वातावरणानंतर राजकीय नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोपही केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं राजकीय वातावरण देखील तापलं होतं. दरम्यान, आजच्या या महाविकास आघाडीच्या सभेकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असून, राजकीय नेते आज काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -