Chhagan Bhujbal : मराठा आणि कुणबी एक आहे हा मूर्खपणा असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मराठा समाज हा मागास नाही असे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही. मराठा कुणबी एक होऊ शकत नाही असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी केलं आहे. 50 टक्के आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांसाठी आहे. पण मराठा समाज हा सामाजिक मागास ठरत नाही असे भुजबळ म्हणाले. आमच्या ओबीसीच्या आरक्षणात दुसरे वाटेकरी नको असेही भुजबळ म्हणाले. शरद पवार असो की देवेंद्र फडणवीस कोणीही ओबीसीमध्ये एससीमध्ये एसटीमध्ये नवीन जात टाकू शकत नाही असे भुजबळ म्हणाले. आमच्यावर अन्याय झाला तर लाखोंच्या संख्येने मुंबईत येणार असल्याचे भुजबळ म्हणाले. 

27 टक्के आरक्षणातील 17 टक्के शिल्लक

आज मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटलो आहे. गॅजेट्स सगळे दफ्तर आहे. कोटा ओलांडला तर आम्ही दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर राहणार असल्याचे भुजबळ म्हणाले. केंद्र सरकारने एक कायदा बनविला आहे. जे ओबीसी किंवा दलित, आदिवासीमध्ये बसत नाहीत पण आर्थिक मागास आहे. पण सामाजिक दृष्ट्या EWS आरक्षण लागू झाले आहे. त्यात 10 टक्के आहे,  इतर 8   टक्के उमेदवार मराठा समाजाचे आहेत हे सरकारने जाहीर केल्याचे भुजबळ म्हणाले. ब्राम्हण सुद्धा शेतकरीआहेत. मारवाडी देखील शेतकरी आहेत, मग ते कुणबी आहेत का असे भुजबळ म्हणाले. 27 टक्क्यामधील 17 टक्के शिल्लक आहे. या 17 टक्क्यांमध्ये 374 जाती आहेत. तुम्ही आमच्यामध्ये आणखी कोणी टाकू नका

ओबीसीचा नेता म्हणूनच मी मंत्रीमंडळात

मी ओबीसीचा नेता म्हणूनच इथे बसलो आहे. मंत्रीमंडळात सुद्धा ओबीसीचा नेता म्हणूनच बसलो असल्याचे भुजबळ म्हणाले. आम्ही जिल्ह्यात उपोषण करु, यात्रा काढू, मुंबईत लाखोंच्या संख्येने मोर्चा काढू असा इशारा देखील भुजबळ यांनी दिला आहे. आमदारांनी मागणी केली म्हणजे कायदा होत नाही.  उद्या कुणीही काहीही मागणी केली तर होत नाही असे भुजबळ म्हणाले. अधिवेशनात ठराव केला तरी होत नाही, नियमाचा रस्ता आहे, त्यानुसार जावे लागेल असे भुजबल म्हणाले. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांनी ओबीसीला धक्का लावणार नाही असे सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Devendra Fadnavis : काही लोकांनी धुडगूस घातला, नंतर उपाशी ठेवल्याचा आरोप केला; व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्यावरुन देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?