Chhagan Bhujbal : ओबीसींवर (OBC) जेव्हा गदा येईल तेव्हा आपण सर्वांनी एकत्र यायला हवं, असे मत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी व्यक्त केले. त्या जरांगेला काहीच कळत नाही. एखादा समजदार असेल तर त्याच्यासोबत लढणं ठिक आहे. पण ज्याला समजत नाही त्याच्याबद्दल काय बोलणार, असा टोला छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांना लगावला. यावेळी भुजबळांनी जरांगे पाटील यांची नक्कल केल्याचं पाहायला मिळालं. कोणी काळजी करु नका आपण लढणर आणि जिंकणार असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला. 

Continues below advertisement

आम्हालाही पक्ष बाजूल ठेवून लढावं लागेल

जरांगे बोलला की ओबीसीच्या उमेदवारांना पाडा, मग आपण काय सांगायचं? तो जर हेच बोलणार असेल तर आम्हालाही पक्ष बाजूल ठेवून लढावं लागेल असं छगन भुजबळ म्हणाले. हा अशा पद्धतीने बोलत असेल तर आम्हालाही ओबीसीला असं सांगावं लागेल. एकीनं लढलं पाहिजे, रात्र वैऱ्याची आहे, सर्वांनी जागे राहिलं पाहिजे असे भुजबळ म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Continues below advertisement

Chhagan Bhujbal : दलितांना वेगळा न्याय लावणार का? सुरेश धसांच्या सोमनाथ सूर्यवंशींबाबतच्या वक्तव्यानंतर भुजबळांचा सरकारला कोंडीत पकडणारा सवाल