Maratha Reservation : ओबीसीचे शून्य टक्केही (OBC Reservation) आरक्षण कमी होणार नाही, मराठा समाजाला (Maratha Reservation) वेगळे आरक्षण देण्यावर भाजप ठाम आहे. सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यावर एकमत झाले आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. ते नागपूरमध्ये बोलत होते. त्याशिवाय मराठा आरक्षणाची अधिसूचना अंतिम नाही, ओबीसी नेते हरकती नोंदवू शकतात, असेही ते म्हणाले. 


कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळत नव्हते,मात्र आता प्रमाणपत्र मिळणे सोपे होईल. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचा निर्णय सरकार घेईल,असे अश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले होते. मात्र ज्याच्या कुणबी नोंदी आहेत त्यांचा निर्णय झाला आहे. ओबीसीमध्ये ज्या कुणबी नोंदी आहेत त्याबद्दलचा निर्णय झाला आहे. ओबीसीचे शून्य टक्केही आरक्षण कमी होणार नाही, मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यावर भाजप ठाम आहे. सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यावर एकमत झाले आहे, ओबीसीवर अन्याय होणार नाही, ओबीसी आरक्षण टिकवणे,मंत्रालय टिकवणे हे फडणवीसांनी काम केलं आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. ओबीसींनी घाबरू नये, अधिसूचना काढल्यावर हरकती येणार आहेत, अद्याप अंतिम अध्यादेश काढलेला नाही, असेही ते म्हणाले. 


सरकारने अधिसूचना काढली आहे, त्यावर आक्षेप मागितले आहेत, सुनावणी होईल, अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी सुनावणी होईल,त्यात आपले म्हणणे मांडता येईल. छगन भुजबळांनी वेगळी भूमिका घेतली नाही, कोण काय मत व्यक्त करते, ईडब्ल्यूएसचे आरक्षण सुरू आहे. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, पण मुख्यमंत्री आणि भुजबळ बसतील आणि कन्फ्युजन दूर करतील, असे  चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. 



शिवसेना निकालावर काय म्हणाले ?


उद्धव ठाकरेंच्या मना लायक निर्णय लागला नाही, राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला तो विधिमंडळाच्या नियमात जे आहे असा निर्णय दिला आहे, असे बावनकुळे म्हणाले. 


 भाजप तयारी -


महायुतीचे जिल्हा मेळावे झाले,आता विभागीय मेळावे होतील,भाजप 48 जागांवर महायुती च्या उमेदवारांना बळ देतील,आमचे सुपर वारीयर काम करतील,50 हजार युनिट गाव चलो अभियान सुरू करतील,24 तासांसाठी नेते मुक्कामी जाणार आहेत,संघटनांक बांधणी करणार,4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत अभियान करू, असे बावनकुळे म्हणाले.