Amravati News अमरावती : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एवढे बावचळले आहेत की जसं मुघलांना संताजी धनाजी दिसायचे, त्यांनी मुघलांना इतकं घाबरवलं होतं, तसं उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) घाबरली आहे. त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात आता आपल्याला भोपळाही मिळणार नाही. महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार इतकं चांगले काम करत आहे की, मोदीजींनी ज्याप्रमाणे देशाला आणि महाराष्ट्राला गती देत गॅरंटी दिली आहे त्याचे चित्र आज स्पष्ट झाले आहे.
2019 ला झालेल्या निवडणुकांमध्ये मोदीजींनी (PM Narendra Modi) ज्या आश्वासनावर जनतेकडून मतांचे कर्ज घेतलं होतं, ते आश्वासन भाजपमधील नेते आणि मोदीजींनी आपल्या कामातून आपले कर्ज फेडले आहेत. जनता ही मोदीजींच्या आणि महायुती सोबत आहे. जसं जसं मोदीजींचे वादळ महाराष्ट्रात आणि देशात येईल, तसं तसं महाविकास आघाडी ही पत्त्यासारखी उडाल्या शिवाय राहणार नाही. असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर करत महाविकास आघाडीवर निशाना साधला आहे.
मर्द मराठा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
एकनाथजी शिंदे सारखा एक मर्द मराठा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. देवेंद्रजींसारखा अष्टपैलू कर्तुत्वाचा धनी नेता या महाराष्ट्राला मिळाला आहे. अजित पवार सारखा पूर्णपणे काम करणारा उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आहे. राज्यातले डबल इंजिन सरकार मोदीजींचा नेतृत्वात आपला पूर्ण वेळ महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देत आहे. उलट उद्धव ठाकरेंना मझा एक प्रश्न आहे की, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता, तेव्हा तुम्ही अडीच वर्षात दोनच मंत्रालयात आणि विधिमंडळात झाले होते. आता खरा राज्याला न्याय देणारा मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे कि एकनाथ शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे जनता ही या महायुती सारकारच्या मागे उभी असल्याचे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही
एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि अजित दादा हे आपल्या राज्याचे चांगले बॅट्समन आहे. ते राज्यात चांगलं काम करत असल्याने याबद्दल महाराष्ट्राची जनता समाधानी आहे. आगामी निवडणुकांसाठी महायुती लवकरच आपल्या जागा घोषित करेल. आमचं केंद्रीय नेतृत्व जी जागा ज्यांना घोषित करेल त्यांना 51 टक्क्यांनी निवडून आणणं, ही आमची जबाबदारी आहे. जो उमेदवार असेल त्यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील. मला शंभर टक्के विश्वास आहे अमरावती लोकसभेची जागा 51% मत घेऊन विजयी होईल. महाराष्ट्र आणि विदर्भात काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, अशी सध्या काँग्रेसची स्थिती असल्याचे देखील बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्रात अशा घटना होणे अपेक्षित नाही
एखाद्या घटनेमुळे महायुतीमध्ये काही फरक पडत नाही. अनावधानाने काही घटना घडतात. काही घटनांना कारण असतात. त्याची सखोल चौकशी गृहखात करत आहे. शेवटी आमची महायुती भक्कम आहे. अशा घटना यापूर्वी देखील महाराष्ट्रात झाल्या आहेत. त्याचे उदाहरण देऊन झालेली घटना झाकता येणार नाही. हे महाराष्ट्राचे संस्कार नाही. ज्याप्रमाणे या घटना घडत आहे, ही गोष्ट आम्हाला मान्य नाही आहे.
अशी घटना या महाराष्ट्रात होऊ नये यासाठी सर्व नेत्यांनी स्वताला सांभाळलं पाहिजे. महाराष्ट्र साधुसंतांचा आणि वैचारिक प्रगल्भ असलेले राष्ट्र आहे. महाराष्ट्रात अशा घटना होणे अपेक्षित नाही आहे. या घटनेतून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. शेवटी गृहखात सखोल चौकशी केल्यानंतर जो काही रिपोर्ट देईल त्यावर कारवाई केल्या जाईल. असे देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोळीबार प्रकरणावर भाष्य करत आपले मत स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या