शिर्डी: राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा आणि भाजपचे खासदार संजय काकडे यांच्या मुलांच्या शाही विवाह सोहळ्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केलं आहे. ‘परिश्रम करुन जमवलेले पैसे लग्नासाठी खर्च केले तर यात काय चुकीचं आहे?’, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
काकडे-देशमुख यांनी मुला-मुलींच्या सुखासाठी हा खर्च केला आहे. तसंच यासाठी लागणारे पैसे त्यांनी कुठे डल्ला मारुन कमावलेले नाहीत, अशा शब्दात चंद्रकात पाटील यांनी काकडे-देशमुख परिवाराची पाठराखण केली आहे.
‘लग्नावर खर्च करत असताना सामाजिक भावनेने छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलासाठी त्यांनी दोन कोटी रुपये दिले आहेत हीदेखील महत्वाचं आहे.’ असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल (सोमवारी) शिर्डीत साईंचं दर्शन घेतलं. साईदर्शनानंतर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना देशमुख-काकडे यांच्या शाही विवाहाचं समर्थन केलं.
संबंधित बातम्या:
देशमुखांचा मुलगा आणि संजय काकडेंच्या मुलीचा शाही विवाह