नागपूर : मातृदिनानिमित्त नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत उच्च शिक्षित करण्याची शपथ महिलांनी घेतली. एबीपी माझा आणि जनलक्ष्मी फायनान्सच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात जनरल पोस्ट मास्टर मरियमा थॉमस यांनी मुलं आणि त्यांच्या पालंकाना मार्गदर्शन केलं. तसेच उपस्थित महिलांनीही आपले विचार उपस्थितांसमोर मांडले.

यावेळी श्रीमती मरियमा थॉमस यांनी आपले विचार मांडताना, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केलं. त्या म्हणाल्या कि, आजच्या महिला आपल्या मुलांना शिकवू ही शकतात आणि आणि त्यांना पुढच्या अभ्यासात बाहेर पाठवू ही शकतात.

तसेच यावेळी सर्व मातांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची शपथ देण्यात आली. यावेळी अनेक मातांनी आपल्या मुलांचे शिक्षण झाल्यावर त्यांनी काय बनावे ह्याची स्वप्नं मांडली त्यांना जनलक्ष्मीचे रिजनल हेड जयप्रकाश यांनी प्रोत्साहन दिले.