पंढरपूर : स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांचा 11 डिसेंबरपूर्वी राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी राणेंचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे.

पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेनंतर चंद्रकांत पाटील बोलत होते.

एकनाथ खडसेंबाबतही सकारात्मक निर्णय?

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची चिन्ह आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यातील बैठकीत याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री याबाबत सकारात्मक विचार करत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला शिवसेनेचा खोडा असल्याची माहिती आहे. मात्र शिवसेना याबाबत मदत करेन, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

राज्याच्या तिजोरीवरील कर्ज 4 लाख 17 हजार कोटींवर गेलं आहे. मात्र खर्च वाढला असून उत्पन्न वाढीला मर्यादा आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवाय कर्जाचा बोजा वाढल्याने कोणत्याही विकासकामांना कात्र लावली जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

ईडीनं आरोपपत्र दाखल केलेले राणे मंत्रिमंडळात का? : शिवसेना


नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशात शिवसेनेचा खोडा?