Chandrakant Patil : महाराष्ट्रात एकूण 280 जागी निवडुक सुरु आहे. त्यामध्ये 256 ठिकाणावर भाजप कमळावर निवडणूक लढवत आहे. त्यापैकी भाजप 200 नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका जिंकेल असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, ही धरुन आणलेली गर्दी नाही. देवेंद्र फडणवीस, आम्ही फिरतोय, त्यामुळं या निवडणुकीत बिहार सारखं आणि महाराष्ट्र विधानसभा सारखं यश मिळेल असा आम्हाला विश्वास असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
नाशिक झाडे तोड प्रकरणावर काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
नाशिक झाडे तोड प्रकरणावरही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. नेमकं काय घडले माहित नाही, हा नेहमीचाच वाद आहे. विकास की पर्यावरण पण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं चंद्रकांत पाटील म्हणाले. या मुद्द्यामुळेच मुंबईची मेट्रो लांबवली. समृद्धी महामार्गमध्ये देखील असेच झालं होतं. पर्यावरण वाद्यांनी देखील विचार केला पाहिजे. जेवढी झाडे आम्ही तोडू त्याच्या पाचपट झाडे आम्ही लावणार आहोत. जुनी झाड दुसऱ्या ठिकाणी लावण्याची यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. ती झाडे जगण्याचे प्रमाण 70 टक्के असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. नाशिक कुंभमेळ्यात एक करोडहून अधिक लोक येणार आहेत. जगातून देखील लोक येणार आहेत असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
एखाद्या नेत्याच्या घरी पैसे सापडले तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि निवडणूक आयोग बघेल
सिंधुदुर्गमध्ये महायुतीत सुरु असलेल्या वादावर देखील चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कशा लढवाव्यात याबाबत चर्चा झाली. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही संदिग्धता न राहता स्थानिक कार्यकर्त्यासाठी निवडणूक लढवावी लागली तर एकमेकावर टीका करु नये असं सांगितलं होतं. पण हे पथ्य काही ठिकाणी पाळलेलं नाही. काही ठिकाणी घडलेल्या घटनांवरुन नियम तयार होत नाही. सिंधुदुर्गात शिवसेनेच्या नेत्यांनी काहीतरी भूमिका मांडली तर त्यांचे नेते त्यांना समज देतील. एखाद्या नेत्याच्या घरी पैसे सापडले तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आणि निवडणूक आयोग बघेल असे चंद्रकांत पाटील म्हणाले. पण तुम्हाला कोणी त्या घरात घुसण्याचा अधिकार दिला. निलेश राणे वागले म्हणजे शिवसेना वागले असं नाही. एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली असेल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
एखादा नेता चुकीचा वागला तर मुख्यमंत्री त्यांना तातडीने समज देतात
एखादा नेता चुकीचा वागला तर मुख्यमंत्री त्यांना तातडीने समज देतात. सिंधुदुर्गात हे घडलं म्हणून इतरत्र अशी परिस्थिती असं म्हणणं चूक आहे. काही ठिकाणी घडले असेल, पण अनेक ठिकाणी असं झालेलं नाही. उदाहरणार्थ कागल. पक्षश्रेष्ठीनी सांगितलं कागलमध्ये चिन्हावर निवडणूक लढवू नका. आम्ही ते मान्य केल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. महाराष्ट्रात एकमेव कागल नगरपरिषद आहे जिथे भाजपाचा एकही माणूस नाही. गडहिंग्लज मध्ये देखील मुश्रीफ आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढतोय, तिथं आम्ही शिव्या श्राप देत नाही असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
आता जर 20 जिल्हा परिषदेमध्ये 50 टक्के ओबीसी आरक्षण ओव्हर झाला आहे. तिथं रिजर्वेशन पडणार आहे. त्यामुळे निवडणुका लांबणार. तिथं काय भविष्य बघायला लागतं का? दोन नंतर निवडणुका लावणार असतील तर खूप काळ आहे बसून चर्चा करायला. पुढच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता करू असं रवींद्र चव्हाण याचा बोलण्याचा हेतू असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. निवडणूक आयोग आहे, पोलीस यंत्रणा आहे. त्यामुळे उद्धवजींनी काळजी करण्याची गरज नाही. विधानसभा निवडणुकीत काही न देता माझे मार्जिन एक लाख 12 हजार राहिले आहे. त्यामुळे अशाप्रकारे म्हणून चूक आहे.
शरद पवारांनी निवडणुकीच्या काळात लोकांना कशी खैरात केली याची यादी मी देऊ शकतो
पवार साहेबांनी त्यांच्या काळात काय काय केलं हे मी सांगू शकत नाही. पण त्यांनी निवडणुका कशा जिंकल्या. त्यांनी निवडणुकीच्या काळात लोकांना कशा प्रकारची खैरात केली याची यादी मी देऊ शकतो असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. पवार साहेबांनी लोकांना आवडणाऱ्या योजना राबवल्या. त्यामुळं लोक त्यांना विजय करत होते. लाडकी बहीण योजनेमुळं दोन कोटी बेचाळीस लोकांना योजना मिळाली..दीड कोटी महिलांच्या अकाउंटला पहिल्यांदा रुपया दिसला. याचा जो आनंद आहे त्यातून त्यांनी मतदान केलं. आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं म्हणून टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. शरद पवार महाराष्ट्र राज्याचे चार वेळेला मुख्यमंत्री राहिल्याचे पाटील म्हणाले.