Chandrakant Patil : "नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून (chandrakant patil) अनेक गोष्टी मार्गी लागल्या आहेत. ज्यात औरंगाबादच नामकरण झालं. धाराशिवचं नामकरण झालं. अनेक नावे आहेत ज्यांना भारतरत्न द्यावी लागतील. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात देशाचं नाव उंचावलं आहे. महात्मा फुले यांना भारतरत्न द्यायलाच पाहिजे," असं मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आज (11 एप्रिल) महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या जयंती निमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील महात्मा फुले यांच्या वाड्यात फुलेंना अभिवादन केलं त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.


यावेळी बोलताना त्यांनी फुलेंचं कार्य महान होतं असं ते म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज मोठे कार्यक्रम आहेत. त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फुटली. बहुजन समजाला शिक्षणाची दारे उघडी झाली. फुलेंमुळे आज नोकरी जातीवर नाही तर गुणवत्तेवर दिली जाते. याचं श्रेय महात्मा फुले यांना जातं. सावित्री माईंमुळे आमच्या मुली शिकल्या. त्यांचं कार्य अजूनही अपूर्ण आहे. हा संकल्प आम्ही पूर्ण करणार आहे, असं ते म्हणाले.


शिंदे-फडणवीस सरकार बहुजनांसाठी काम करतंय...


शिंदे-फडणवीस सरकार बहुजनांवर यावर जोरात काम करत आहे. आमचे सरकार तेच काम करणार आहे. बहुजन समाजाला त्यांचा अधिकार आम्ही मिळवून देणार आहे. आम्ही अनेक गोष्टी बहुजन समाजाच्या हिताच्या गोष्टी केल्या. बहुजन समाजाला सुविधा वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे, असंही ते म्हणाले. 


मी संजय राऊत नाही...


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यांचा निर्णय ते घेतात प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी करायला आम्ही काही संजय राऊत नाहीत. 


सकाळीच दादांनी मिसळीवर मारला ताव...


पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी 6 वाजता भव्य अशा कढईमध्ये सर्व पदार्थ आणि मसाले घालून ज्योत पेटवण्यात आली. त्यानंतर सकाळी 7 वाजता संपूर्ण मिसळ तयार झाली. महात्मा फुले वाडा येथे अभिवादनाकरता आलेल्या सर्व नागरिकांना मिसळचे वाटप करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शेफ विष्णू मनोहर यांचं कौतुक करताना ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणात पदार्थ बनवण्यात विष्णू मनोहर यांचा हातखंडा आहे. त्यांनी आजही पाच हजार किलो मिसळ तयार केली आहे आणि माझ्यासोबत अनेक पुणेकर या मिसळीचा आस्वाद घेणार आहेत.