Railways collects fines : सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने काही निर्बंध घातले आहेत. निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या कोरोनाच्या काळात मध्य रेल्वेने देखील अनेक प्रवाशांवर कारवाई केली आहे. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे ज्या प्रवाशांनी पालन केले नाही त्यांच्याकडून मध्य रेल्वेने दंड वसूल केला आहे. या महिन्यात आत्तापर्यंत रेल्वे स्टेशनवर मास्क न घालणाऱ्या 2 हजार 293 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून 3.93 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


मध्य रेल्वेकडून वारंवार प्रवाशांना कोरोनाच्या संदर्भात सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. तरी देखील काही प्रवाशी नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे मध्य रेल्वेन त्यांच्याविरोधात कारवाई करत दंड वसूल केला आहे. मध्ये रेल्वेने ही मोहिम एप्रील  2021 पासून सुरू केली आहे. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. आत्तापर्यंत एकूण 30 हजार 375 प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई केली असून, त्यांच्याकडून 50.20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 12 जानेवारीला रेल्वे स्टेशनवर मास्क न घातलेल्या 256 प्रवाशांवर कारावाई केली. त्यांच्याकडून 44 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.


मंडल-वार कारवाई


मुंबई मंडल - 3 हजार 143 प्रवाशांकडून 6 लाख 18 हजार रुपये 
भुसावळ मंडल - 14 हजार 46 प्रवाशांकडून 16 लाख 41 हजार रुपये 
नागपूर मंडल - 7 हजार 924 प्रवाशांकडून 15 लाख 84 हजार रुपये 
सोलापूर मंडल - 2 हजार 404 प्रवाशांकडून 5 लाख 20 हजार रुपये 
पुणे मंडल - 2 हजार 858 प्रवाशांकडून 6 लाख 57 हजार रुपये 


अशा प्रकारे मध्ये रेल्वेने आत्तापर्यंत जवळपास 30 हजारांहून अधिक प्रवाशांवर कारवाई केली आहे. कोरोनाच्या संदर्भात सरकारने घालून दिलेल्या नियमांचे या प्रवाशांनी पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. 50 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे प्रवाशांनी पालन करावे असे आवाहन केले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: