मुंबई : राज्यातील अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी 22 ते 26 डिसेंबर या काळात केंद्राचे पथक महाराष्ट्राच्या दौर्यावर येणार आहे. 22 डिसेंबरला इंडिगो विमानाने पथक दाखल होणारं आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची हे पथक पाहणी करेल. राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापूस सोयाबीन आणि मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला जमीन खरडून गेली. सोयाबीन व मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला राज्य सरकारने अतिवृष्टीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना काही प्रमाणात नुकसान भरपाई दिली होती. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई चा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. या अहवालावरून राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाने राज्यात नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार 20 ते 26 डिसेंबर दरम्यान केंद्रीय पथक पुणे औरंगाबाद आणि नागपूर विभागातील नुकसानीची पाहणी करेल. मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले असून केंद्रीय पथक स्टेशनवर या दिवशी औरंगाबाद येथे येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील गोष्टींमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाईल 21 डिसेंबर या दिवशी हे पथक औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करेल. परंतु एवढ्या कालावधी अतिवृष्टी होवून उलटल्यानंतर पथक आता नेमकी काय पाहणी करणार आहे हा खरा प्रश्न आहे.
जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर मदत
शेती पिकासाठी जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्यात येईल. फळपिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर, मृतांच्या वारसांना, मयत पशुधनासाठी घरपडझडीसाठी भरीव मदत देण्यात येईल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. नुकसानग्रस्तांकरता 10 हजार कोटी रुपयांची मदत नम्रपणे जाहीर करत आहोत, कृपाकरुन त्याचा स्वीकार करावा. दिवाळीआधी सगळ्यांपपर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं होतं