मुंबई : केंद्र सरकारने देशभरात एमबीबीएसच्या 4465 जागा वाढवल्या असून सर्वाधिक 970 जागा महाराष्ट्रात वाढवल्या आहेत. महाराष्ट्रात खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (Economically Weaker Section) 10 टक्के आरक्षण लागू करण्यासाठी केंद्र सरकारने जागा वाढवण्यासाठी मान्यता दिली.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने MBBS च्या जागा वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. मंत्रालयाने प्रस्तावाला मान्यता देत 2019-20 च्या प्रवेश प्रक्रिया आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (Economically Weaker Section) लागू करण्यात आलेल्या आरक्षणाअंतर्गत भराव्यात, असे आदेश दिले आहेत.
"राज्यात वाढलेल्या एमबीबीएसच्या जागा खुल्या वर्गातील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरतील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. राज्य सरकारने हा प्रश्न सातत्याने दिल्लीत उपस्थित केला होता", असं राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले.
यंदा महाराष्ट्राला मेडिकलच्या जागा वाढवून मिळणार, तात्याराव लहानेंची माहिती
विशेषतः महाराष्ट्रात एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेशातील जागा वाढल्या पाहिजेत, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विशेष प्रयत्न केले होते.
राज्यात डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्टर तयार व्हावेत, हा मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांना जास्तीत जास्त 450 जागा वाढवून मिळाल्या आहेत.
राज्यात मेडिकल कॉलेजमधील जागांची यादी
बी जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, पुणे - 50 जागा
डॉ. वैश्यंपायन मेमोरियल मेडिकल कॉलेज, सोलापूर - 50 जागा
डॉ. शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट कॉलेज, नांदेड - 50 जागा
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, अकोला - 50 जागा
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, औरंगाबाद - 50 seats
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, चंद्रपूर - 50 seats
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, गोंदिया - 50 seats
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जळगाव - 50 seats
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, मिरज - 50 seats
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, नागपूर - 50 seats
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, मुंबई - 50 seats
एच बी टी मेडिकल कॉलेज आणि डॉ. आर एन कुपर महापालिका रुग्णालय, जुहू, मुंबई - 50 जागा
इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय, नागपूर - 50 जागा
लोकमान्य टिळक महापालिका मेडिकल कॉलेज, सायन, मुंबई - 50 जागा
राजीव गांधी मेडिकल कॉलेज आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे - 20 जागा
सेठ जीएस मेडिकल कॉलेज, मुंबई - 70 जागा
श्री वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, यवतमाळ - 50 जागा
श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज, धुळे - 50 जागा
एसआरटीआर मेडिकल कॉलेज, अंबाजोगाई - 50 जागा
टोपीवाला नॅशलन मेडिकल कॉलेज, मुंबई - 30 जागा
महाराष्ट्रात MBBS च्या 970 जागा वाढल्या, देशभरात 4465 जागा वाढवण्यासाठी केंद्र सरकारची मान्यता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jun 2019 11:04 AM (IST)
राज्यात डॉक्टरांची कमतरता लक्षात घेता अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्टर तयार व्हावेत, हा मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन पाठपुरावा करत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -