Vijay Mallya : प्रसिद्ध उद्योगपती आणि फरार असलेला आर्थिक गुन्हेगार विजय माल्याविरोधात (Vijay Mallya) मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai court) विशेष सीबीआय कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल झाले आहे. तब्बल 17 भारतीय बँकांचे (Bank) कर्ज कर्जबुडवल्या प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. विजय मल्याकडे कर्ज फेडण्यासाठी पुरेसा पैसा होता, तरीही त्यानं कर्ज फेडलं नसल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. 


2015-16 मध्ये इंग्लंड आणि फ्रान्समध्ये 330 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी


मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात जे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे, त्यामध्ये विविध आरोप कर्यात आले आहेत.  कर्ज फेडण्याऐवजी देशातून पलायन करण्यापूर्वी त्यानं परदेशात मालमत्ता खरेदी केल्याचा आरोपही सीबीआयने केला आहे. माल्याने संपूर्ण युरोपमध्ये वैयक्तिक मालमत्ता खरेदी केली असून स्वित्झर्लंडमधील त्याच्या मुलांच्या ट्रस्टमध्येही पैसेही हस्तांतरित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच 2015-16 मध्ये इंग्लंड आणि फ्रान्समध्ये 330 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे. माल्यावर 17 बँकांचे 900 कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे. विजय मल्याकडे कर्ज फेडण्यासाठी पुरेसा पैसा होता, तरीही त्यानं कर्ज फेडलं नसल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. दरम्यान, 5 जानेवारी 2019 रोजी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं मल्ल्याल  'फरार' घोषित केलं आहे. 


परदेशात मालमत्ता खरेदी


सीबीआय कोर्टात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार विजय माल्याने 2015-16 मध्ये यूकेमध्ये 80 कोटींची आणि 2008 मध्ये फ्रान्समध्ये 250 कोटींची मालमत्ता खरेदी केली होती. त्या काळात विमान कंपन्यांना रोख रकमेची तीव्र टंचाई जाणवत होती आणि मल्ल्याने बँकेचे कर्ज फेडले नव्हते. तसेचआरोपपत्रात दावा करण्यात आला आहे की, मल्ल्याकडे 2008 ते 2016-17 दरम्यान मोठा निधी होता. तरीही त्याने बँकांचे कर्ज फेडले नाही. विजय मल्ल्या हा आयडीबीआय बँक-किंगफिशर एअरलाइन्सच्या 900 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणूक प्रकरणात आरोपी आहे. त्याची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) मार्फत चौकशी केली जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Anurag Kashyap: विजय मल्ल्याची भूमिका साकारणार अनुराग कश्यप? चर्चेला उधाण