Anurag Kashyap: 'गँग्स ऑफ वासेपूर' (Gangs of Wasseypur), 'रमन राघव' (Raman Raghav 2.0) आणि 'ब्लॅक फ्राइडे' (Black Friday) या हिट चित्रपटांचा दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसेच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. आता लवकरच अनुराग हा एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या आगामी चित्रपटामध्ये अनुराग हा फरार मद्यसम्राट विजय मल्ल्याची भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचं नाव फाइल नंबर 323 असं असणार आहे. 


अनुरागनं फाइल नंबर 323 बरोबरच 'अकीरा', 'धूमकेतु' आणि 'मुक्काबाज' या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. तसेच छुरी या शॉर्ट फिल्ममध्ये देखील अनुरागनं काम केलं आहे. आता दिग्दर्शक कार्तिक के याच्या फाइल नंबर 323 चित्रपटात अनुराग हा विजय मल्ल्याची भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. कार्तिकच्या या चित्रपटामधून विजय मल्ल्यासोबतच नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांची कथा देखील प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे. 


या कारणामुळे अनुरागची करण्यात आली निवड
विजय मल्ल्याची भूमिका साकारण्यासाठी अनुरागची निवड करण्यामागचे कारण हे अनुरागचे लुक्स हे आहे, असं म्हटलं जात आहे. अनुरागचा लूक हा विजय मल्ल्याच्या लूक प्रमाणेच असल्यानं चित्रपट निर्मात्यांनी अनुरागची निवड या भूमिकेसाठी केली, असं म्हटलं जात आहे. 


20 नोव्हेंबरला सुरु होणार चित्रपटाचं शूटिंग
मुंबईमध्ये 20 नोव्हेंबरला फाइल नंबर 323 या चित्रपटाचं शूटिंग होणार आहे, असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, फाइल नंबर 323  हा चित्रपट 2023 मध्ये रिलीज होईल.


काही दिवसांपूर्वी अनुरागचा दोबारा हा चित्रपट रिलीज झाला होता. अनुराग कश्यपचा दोबारा हा चित्रपट एका स्पॅनिश चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक आहे. अभिनेत्री तापसी पन्नूनं या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 




वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Anurag Kashyap : बायकॉट ट्रेंडवर अनुराग कश्यपची प्रतिक्रिया; म्हणाला, 'माझ्यावर याचा परिणाम होत नाही'