CBSE Pattern : 2025-26 या शालेय शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न (CBSE Pattern) लागू करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलासाठी अभ्यासक्रम लागू होईल व पुढील शैक्षणिक वर्षापासून दोन वर्षात दोन टप्प्यांमध्ये सीबीएसई पॅटर्न शालेय शिक्षणात राबवला जाणार आहे. मात्र, अचानक अशा प्रकारे शालेय शिक्षणमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक आणि आपल्या मुलांना शिक्षण देणाऱ्या पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.  कारण सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार आणि तो दोन टप्प्यांमध्ये राबवला जाणार एवढीच माहिती शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता येणे बाकी आहे. 


'या' प्रश्नांबाबत अजूनही संभ्रम 


1) या वर्षीपासून सीबीएसई पॅटर्न सुरुवात करून पुढील दोन वर्षात प्रार्थमिक आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणासाठी हा राबवला जात असेल तर राज्य मंडळाचे नेमकं काय होणार? 


2) सीबीएसई पॅटर्न राज्यभरात लागू केला जाणार असेल तर राज्य मंडळ आणि राज्य मंडळाचा अभ्यासक्रमाचा काय?


3) सीबीएसई परीक्षा पद्धती आणि वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रक हे राज्य मंडळाचे वेळापत्रक अपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे, तर सीबीएसई पॅटर्न लागू केल्या जात असेल तर त्या वेळापत्रकाचा अवलंब केला जाणार का? 


4) वेळापत्रकाचा अवलंब केला जात असेल तर अभ्यासक्रम 1 एप्रिल पासून सुरू होणार का? 


5) दहावी बारावी बोर्ड परीक्षा राज्य मंडळाकडून घेतल्या जातात त्यामुळे  जर हा पॅटर्न लागू करण्यात आला तर सीबीएसई बोर्ड परीक्षेलाच विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार का?


6) सीबीएसई पॅटर्न लागू करायचा असेल तर त्यासाठी नवी पाठ्यपुस्तक निर्मिती करावी लागणार आहे, या पाठ्यपुस्तक निर्मितीचा काम  बालभारती करणार? ती बालभारती एनसीईआरटी मध्ये विलीनीकरण होणार?


7) पुढील दोन वर्षात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा जर निर्णय झाला असेल तर त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण आणि सर्व इयत्तांसाठीची पाठ्यपुस्तक निर्मिती करणे शक्य आहे का? 


8) राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील अभ्यासक्रमात नेमका वेगळेपण असणार का आणि असेल तर ते कशाप्रकारे असणार? जर वेगळेपण नसेल तर राज्य मंडळाचे नेमकं काय होणार? 


9) सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार म्हणजे जी पुस्तक सीबीएसई या शाळांमध्ये वापरली जाणार तीच राज्य मंडळाच्या शाळांमध्ये वापरली जाणार का?



आणखी वाचा 


मोठी बातमी : राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू, शिक्षणमंत्र्यांचं सभागृहात लेखी उत्तर


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI