CBSE 10th Result : सीबीएसई दहावी बोर्डाच्या अंतर्गत मूल्यांकनाबाबतचे निकष जारी करण्यात आले आहेत. मूल्यपमान पूर्ण करून 20 जून पर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रत्येक शाळेत रिझल्ट समिती नेमण्यात येईल. यामध्ये शाळेचे प्राचार्य आणि एकूण 7 शिक्षक असतील. 7 शिक्षकांमध्ये 5 शिक्षक हे शाळेतील तर 2 शिक्षक हे दुसऱ्या जवळच्या शाळेतील नेमण्यात येतील.
कसे होणार मूल्यमापन
20 गुण - अंतर्गत मूल्यमापन ( इंटर्नल असेसमेंट )
80 गुणांचे अंतर्गत मूल्यमापन खालील प्रमाणे
10 गुण- घटक चाचणी परीक्षांचे गुण (युनिट टेस्ट )
30 गुण - सहामाही / सत्र परीक्षेचे गुण
40 गुण - बोर्डाच्या सराव परीक्षा गुण (प्री लिम परीक्षा गुण)
मूल्यमापन करण्यासाठी प्रत्येक शाळेत रिझल्ट समिती नेमण्यात येणार
प्रत्येक शाळेत रिझल्ट समिती नेमण्यात येईल. यामध्ये शाळेचे प्राचार्य आणि एकूण 7 शिक्षक असतील. 7 शिक्षकांमध्ये 5 शिक्षक हे शाळेतील तर 2 शिक्षक हे दुसऱ्या जवळच्या शाळेतील नेमण्यात येतील.
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयासाठी 100 पैकी मार्क्स दिले जातील. यामध्ये 20 मार्क हे इंटरनल असेसमेंटसाठी असतील. तर बाकीचे 80 रिझल्ट समिती देईल. बहुतांश शाळांमध्ये इटरनल असेसमेंटची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ज्या शाळांनी इंटरनल असेसमेंटचे मार्क सीबीएसई पोर्टलवर अपलोड केलेले नाहीत. त्यांना ते 11 जून 2021 पर्यंत अपलोड करणे बंधनकारक असेल.
चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थाने विविध परीक्षांमध्ये मिळवलेले गुण यांच्या आधारवर बाकीच्या 80 गुणांपैकी गुण दिले जातील.
या सर्व प्रक्रियेत पारदर्शकपता, सत्यता असणे गरजेचे आहे. त्यासाठी सीबीएसई बोर्डाकडून शाळेने दिलेल्या गुणांचे मूल्यांकन केले जाऊ शकते.
मूल्यमापन वेळापत्रक कसे असेल
5 मे - शाळांनी रिझल्ट कमिटी तयार करणे
25 मे - शाळेकडून अंतिम निकालाची तयारी करणे
28 मे - शाळेकडून मोडरेशन आणि तपासणी
5 जून - सीबीएसई कडे शाळांनी मार्क पाठविणे
11 जून- इंटर्नल असेसमेंट चे 20 गुण सीबीएसईकडे शाळांनी पाठविणे
20 जून - सीबीएसई कडून 10 वी बोर्डाचा निकाल जाहीर करणे