पुणे: थकलेले कर भरण्यासाठी नागरिकांनी जुन्या नोटांचा खजिना बाहेर काढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यात महापालिकांसोबतच नगरपालिकांच्या तिजोऱ्यांमध्ये दिवसभरात कोट्यवधी रुपये जमले आहेत.

पुणे महापालिकेत दिवसभरात विविध मिळकत करांपोटी तब्बल 26 कोटी 44 लाखांची रक्कम जमा झाली आहे.

त्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवली, जळगाव, धुळे, नांदेड याठिकाणीही लोकांनी थकलेले कर भरण्यास सुरुवात केली आहे. केवळ आजच जुन्या नोटांनी कर भागवता येणार आहेत.

त्यामुळे सर्वच थकबाक्या क्लिअर करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दीही केली आहे.

कोणकोणत्या महापालिकेत किती रक्कम जमा? (रात्री 9 पर्यंतची आकडेवारी)


बृहन्मुंबई महानगरपालिका - 1 कोटी 97 लाख

ठाणे - 13 कोटी 37 लाख

कल्याण-डोंबिवली - 7 कोटी 13 लाख

उल्हासनगर महापालिका - 10 कोटी

अंबरनाथ - 22 लाख

मीरा-भाईंदर - 5 कोटी 13 लाख

वसई विरार - 3 कोटी 68 लाख

नवी मुंबई - 12 कोटी

पुणे महापालिका  - 26 कोटी 44 लाख

पिंपरी चिंचवड - 10 कोटी

जळगाव - 60 लाख

नाशिक - 8 कोटी 6 लाख

धुळे - 70 लाख

मालेगाव - 46 लाख

नांदेड - 24 लाख

औरंगाबाद - 53 लाख

अहमदनगर : 4 कोटी 62 लाख

उस्मानाबाद - 9 लाख

लातुर - 40 लाख

चंद्रपूर - 22 लाख

गोंदिया - 1 कोटी 15 लाख

नांदेड : 2 कोटी 85 लाख

नागपूर - 1 कोटी 10 लाख

वर्धा - 16 लाख

यवतमाळ - 12 लाख

अकोला - 23 लाख

कोल्हापूर - 2 कोटी 40 लाख

इचलकरंजी - 20 लाख

सोलापूर - 6 कोटी

सांगली - 90 लाख

आज दिवसाअखेर जुन्या नोटांच्या माध्यमातून राज्यभरात नागरिकांनी 173 कोटी रुपयांचा कर भरला आहे.