मुंबई : ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेतील नेत्यांवर ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांच्यावर  कलम 153, 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.  ठाण्यातील टेंभीनाका येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाची महाप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळ्यातील भाषणात सुषणा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी मानहानीकारक वक्तव्य केल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


या मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती. तर भास्कर जाधव यांनी भाजप नेते गिरीष महाजन यांची नक्कल केली होती. यातून बदनामी झाल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर ठाण्याच्या नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. शिंदे गटाचे बाळा गवस यांनी याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार सर्व नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. 


रविवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनात ठाकरे गटाच्या महाप्रबोधनयात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी सुषमा अंधारे, विनायक राऊत भास्कर जाधव, मधुकर देशमुख आणि अनिता बिर्जे यांनी भाषणे केले. यावेळी या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक व चिथावणीखोर वक्तव्य करत शिंदे, यांची प्रतिमा मलीन केली. याबरोबरच इतर राजकीय नेत्यांबद्दल अवमानजनक शब्द वापरल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवत हा गुन्हा दाखल केला.   


दरम्यान, या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी एबीपी माझासोबत बोलताना या गुन्ह्याबाबत अद्याप आपल्याकडे रीतसर गुन्ह्याची प्रत न आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.  "विविध प्रसार माध्यमांकडून असे कळले की, महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटन सभेतील वक्ते म्हणून खासदार राजन विचारे मी स्वतः,  आमदार भास्कर जाधव खासदार विनायक राऊत  आणि आमच्या अनिताताई बिरजे यांच्यावरती 153 अ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, अजूनही माझ्याकडे रीतसर याची प्रत मिळालेली नाही. महाप्रबोधन यात्रेतील सगळी भाषणं पब्लिक डोमेनमध्ये आहेत. ती तपासून घेता येतील. मला खात्री आहे, त्यातलं एकही वाक्य हे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही. कायदा माझ्या बापाने लिहिला आहे आणि त्याचा सन्मान राखणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. तरीसुद्धा 153 अ अर्थात चितावणीखोर वक्तव्य या सबबी खाली दाखल झालेला गुन्हा हा आमच्या महाप्रबोधन यात्रेच्या सुरुवातीचा शुभशकुन आहे असा आम्ही समजतो, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.  


महत्वाच्या बातम्या


ज्या झाडाने सावली दिली, त्याच झाडावर घाव घालताना शिंदेंना काहीच वाटलं नाही? सुषमा अंधारेंची घणाघाती टीका 


Majha Katta : तुम्ही चुकीच्या वेळेस आलात, पक्षप्रवेश करताना उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंना काय म्हणाले होते