विदर्भवाद्यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ, मनसेच्या 8 कार्यकर्त्यांवर गुन्हे
एबीपी माझा वेब टीम | 13 Sep 2016 05:43 PM (IST)
मुंबईः विदर्भवाद्यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातल्याप्रकरणी मनसेचे संदीप देशपांडे, अमेय खोपकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद नगर पोलिस स्थानकात कलम 143 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विदर्भवाद्यांच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत, पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. त्यामुळं विदर्भवादी नेत्यांना पत्रकार परिषद बंद करण्याची वेळ आली.