शिर्डीत कार 500 फूट दरीत कोसळून एकाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 09 Sep 2018 08:36 AM (IST)
संगमनेर तालुक्यातील माहुली गावाजवळ गाडी पाचशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला
शिर्डी : गाडी 500 फूट खोल दरीत कोसळून शिर्डीत झालेल्या अपघातात एकाला प्राण गमवावे लागले, तर दोघं जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे-नाशिक महामार्गावर माहुलीजवळ हा अपघात झाला. पुण्याचे रहिवासी शिर्डीला जात असताना सकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. संगमनेर तालुक्यातील माहुली गावाजवळ गाडी पाचशे फूट खोल दरीत कोसळली. अपघातात गाडीतील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. काही नागरिकांनी मदत करत जखमींना गाडीतून बाहेर काढलं. जखमींना उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केलं.