यवतमाळमध्ये कार नदीत कोसळून तिघांचा जागीच मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 25 Aug 2017 02:19 PM (IST)
मार्लेगावजवळ कठडे नसलेल्या पुलावरुन कार पैनगंगा नदीच्या पात्रात कोसळली. ट्रकची कारला धडक लागल्याने अपघात झाला आहे.
यवतमाळ : यवतमाळमधील उमरखेड-हदगाव मार्गावरील कार पैनगंगा नदीत कोसळून तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. एका ट्रकची कारला धडक बसल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मार्लेगावजवळ कठडे नसलेल्या पुलावरुन कार पैनगंगा नदीच्या पात्रात कोसळली. ट्रकची कारला धडक लागल्याने अपघात झाला आहे. उमरखेड जवळून ही नदी वाहते आणि या नदीच्या पुलावर कठडे नाहीत तिथूनच ही कार नदीमध्ये कोसळली. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. परभणी येथील वजन मापे विभागातील निरीक्षक ज्ञानेश्वर गोटे, त्यांची पत्नी रत्ना गोटे व चालक अशा तिघांचा या अपघातात मृत्यू झाला असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे.