बीड : जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोवर मेगा भरती रद्द करा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन सुरुच आहे. ठोस मागणी मान्य होत नाही तोवर इथला ठिय्या मागे घेणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला विठ्ठलाची शासकीय पूजाही रद्द केली. मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांकडून आता नवी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात होणाऱ्या मेगाभरतीमध्ये मराठा समाजासाठी 16 टक्के जागा राखीव असतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. कारण, सध्या मराठा आरक्षणाचा निकाल हायकोर्टात प्रलंबित आहे. निकाल आल्यानंतर बॅकलॉग भरला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.
परळीतील शिवाजी चौकातून 18 जुलै रोजी ठिय्या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली होती. अजूनही हे आंदोलन सुरुच आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलकांना चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र मुख्यमंत्र्यांचं लेखी आश्वासन हवं, अशी आंदोलकांची मागणी आहे.
आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती रद्द करा, मराठा मोर्चाची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jul 2018 11:24 AM (IST)
गेल्या सहा दिवसांपासून परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन सुरुच आहे. ठोस मागणी मान्य होत नाही तोवर इथला ठिय्या मागे घेणार नाही, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -