मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपध घेणार हे निश्चित झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारातील महत्त्वाची आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ठाकरे कुटुंबातून पहिल्या निवडणूक लढणारे, पहिल्यांदा आमदार होणाऱ्या आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज शपथ घेणाऱ्या 36 आमदारांची यादी राजभवनाने जाहीर केली आहे. आदित्य ठाकरेंना पर्यटन किंवा शिक्षण खांत मिळण्याची शक्यता आहे. आज 25 आमदार कॅबिनेट मंत्रिपदाची आणि 10 आमदार राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.


ठाकरे सरकारचा पहिला शपथविधी सोहळा 28 नोव्हेंबरला पार पडला होता. त्यानंतर तब्बल महिनाभरानंतर ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. पहिल्या शपथविधी सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. तर तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाचा शपथ घेतली होती. त्यामध्ये राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, जयंत पाटील, शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली होती.


शिवसेनेकडून हे नेते मंत्रिपदाची शपथ घेणार

आदित्य ठाकरे (मुंबई)
अनिल परब (मुंबई)
उदय सामंत (रत्नागिरी)
गुलाबराव पाटील (जळगाव)
दादा भुसे (मालेगाव, नाशिक)
संजय राठोड (दिग्रस, यवतमाळ)
संदीपान भुमरे (पैठण, औरंगाबाद)
शंकरराव गडाख , नेवासाचे अपक्ष आमदार (नेवासा, अहमदनगर)
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) (सिल्लोड, औरंगाबाद)
राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (शिरोळ, कोल्हापूर)
शंभूराज देसाई (राज्यमंत्री) (पाटण, सातारा)
बच्चू कडू, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (अचलपूर, अमरावती)

काँग्रेसमधून हे नेते शपथ घेणार

के.सी.पाडवी (धुळे) (अक्कलकुवा, नंदुरबार)
अशोक चव्हाण (नांदेड)
अमित देशमुख (लातूर)
यशोमती ठाकूर (अमरावती)
विजय वड्डेटीवार (चंद्रपूर)
सुनील केदार (नागपूर)
अस्लम शेख  (मुंबई)
वर्षा गायकवाड  (मुंबई)
सतेज पाटील (राज्यमंत्री) (कोल्हापूर)
विश्वजित कदम (राज्यमंत्री) (सांगली)

राष्ट्रवादीचे हे नेते शपथ घेणार

अजित पवार (उपमुख्यमंत्री) (बारामती, पुणे)
दिलीप वळसे पाटील (आंबेगाव, पुणे)
धनंजय मुंडे (परळी, बीड)
अनिल देशमुख (नागपूर)
डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखे़ड राजा, बुलडाणा)
हसन मुश्रीफ (कागल, कोल्हापूर)
जितेंद्र आव्हाड (ठाणे)
नवाब मलिक  (मुंबई)
बाळासाहेब पाटील (कराड, सातारा)
राजेश टोपे (अंबड, जालना)
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) (अहमदनगर)
दत्ता भरणे (राज्यमंत्री) (इंदापूर)
अदिती तटकरे (राज्यमंत्री) (रायगड)
संजय बनसोडे (राज्यमंत्री) (उदगीर, लातूर)