मुंबई: शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत, भटक्या विमुक्त जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्ग व  इतर मागास प्रवर्गातील पालकांची उत्पन्न मर्यादा  4.50 लाख रुपयांवरून 6 लाख करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजा झालेल्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

 

माध्यमिक शालांत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता सध्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाची कमाल मर्यादा यापूर्वी नव्हती.

 

परंतु विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता 4.50 लाख अशी पालकांची उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यात आली होती. ही उत्पन्न मर्यादा 6 लाख  वर्ष 2016-17 पासून लागू होणार आहे.