मनमाड-जळगाव रेल्वेच्या तिसऱ्या ट्रॅकला केंद्राची मंजुरी
एबीपी माझा वेब टीम | 17 May 2017 11:52 PM (IST)
फाईल फोटो
नवी दिल्ली: मनमाड-जळगाव दरम्यान रेल्वेच्या तिसऱ्या इलेक्ट्रिक ट्रॅकला आज मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मनमाड-जळगाव मार्गावरील वाढतं ट्रॅफिक कमी करण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामध्ये १६० किमी लांब हा ट्रॅकचं काम करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकल्पला 1035 कोटींचा खर्च येईल असा अंदाज आहे. हे संपू्र्ण प्रकल्प येत्या पाच वर्षात पू्र्ण करण्यात येणार आहे. या नव्या लाईनमुळे जळगावच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, जळगाव-भुसावळ या मार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचं काम सध्या सुरु आहे.