बुलडाणा : अशिया खंडातील सर्वात मोठा व देशाचा आयकॉन समजला जाणारा " जय " नावाचा वाघ नागपुर - उमरेड पारिसरातून अचानक गायब झाल्याची घटना घडली होती. युद्धस्तरावर प्रयत्न करूनही हा वाघ अद्याप सापडला नाही , त्याची शिकार झाल्याची शंका  वन्यजीव प्रेमींकडून उपस्थित करण्यात येते. आता एबीपी माझाला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात आलेला C - 1 नावाचा वाघ आता गायब झाल्याची शंका आहे. अशा एका पाठोपाठ वाघ गायब होण्याच्या घटनांनी वाघांचे अस्तित्व मात्र धोक्यात आल्याच चित्र आहे.


 देशात वाघांच्या संवर्धनाला खूप महत्त्व दिले जाते. त्यासाठी विशेष व्याघ्र प्रकल्प सरकारने घोषित केलेत. वाघांच्या हालचालीवर , त्याच्या लोकेशनवर नजर ठेवण्यासाठी आता तर वाघांच्या गळ्यात कॉलर आयडी डिव्हाईस लावण्यात येतात.  अशा परिस्थितीतही ही जर वाघ गायब किंवा बेपत्ता होत असतील तर दोष कोणाचा हे शोधण्याची वेळ आली आहे. अशिया खंडातील सर्वात मोठा असलेला 'जय'  नावाचा वाघ नागपुरच्या उमरेड पारिसरातून गायब झाला होता. त्याची शिकार झाल्याची शंका व्यक्त होत असतानाच आता शेकडो किलोमीटर प्रवास करून तेलंगाणातून बुलडाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात डिसेंबरला आलेल्या C-1 या वाघाच्या बाबतीतही हीच शंका आता उपस्थित होत आहे. महिन्यापासून हा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यातून गायब असल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती आता एबीपी माझ्याच्या हाती आली आहे.


अभयारण्यातील प्रत्येक महत्वाच्या वाघाला एक नाव दिलेले असत. त्याप्रमाणे या वाघला C-1 हे नाव आहे. तो कुठल्या जंगलात आहे? त्यांच नेमके लोकेशन माहिती करण्यासाठी केंद्र सरकारच्या वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात W.I.I. ने महत्वपूर्ण वाघाच्या गळ्यात एक इलेक्ट्रॉनिक यंत्र बांधलेल असते. ज्याला " कॉलर आयडी " म्हणतात. 


 कॉलर आयडी म्हणजे काय?



  • कॉलर आयडी एक इलेक्ट्रॉनिक यंत्र असते जे विशिष्ठ फ्रिक्वेंसीच्या  रेडियो लहरी उत्पन्न करते.

  • कॉलर आयडीतून मिळालेल्या लहरीवरुन त्या संबंधित वाघाच्या लोकेशन ,हालचाली कळतात.

  • कॉलर आयडी ही वाघाच्या गळ्यात पट्टयाद्वारे बांधली जाते.

  • कॉलर आयडी बांधण्याचे किंवा काढण्याच काम देशात फक्त W.I.I  ची टीम करते.

  • कॉलर आयडी डिव्हाईसचे काम सुरु ठेवण्यासाठी त्यात सेल असतात जे काही दिवसानंतर डिस्चार्ज देखील हातात.


 C-1 वाघलाही ज्ञानगंगा अभयारण्यात आल्यावर कॉलर आयडी होती. पण काही महिन्यापूर्वी W.I.I. च्या एका टीमने ती काढून नेल्याचे वन्यजीव विभागाच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे.  आता प्रश्न हा उपस्थित होतो की, वाघाला कॉलर आयडी नसेल तर तो वाघ आता कुठे आहे? जवळपास 9  ते 10 महिन्यापासून या C 1 वाघाचा या परिसरात दिसला   नाही किंवा त्याचे पायाचे ठसे आढळून आले नाहीत. मग हा वाघ " जय " वाघा सारखा गायब तर झाला नाही ना.....? अशी भीती आता व्यक्त होते आहे.