लातूर-धवेली बस सेवा अखेर सुरु, विद्यार्थ्यांनी मानले ‘एबीपी माझा’चे आभार
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 02 Jul 2016 11:11 AM (IST)
लातूर : लातूरमधील धवेली, आनंदवाडी आणि कवठाळी गावात खराब रस्त्यामुळे बस येत नव्हती. त्यामुळे जाणवळला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा सुटली होती. ‘एबीपी माझा’नं ही बातमी दाखवल्यानंतर आजपासून रोज शाळेच्या वेळेनुसार बस सोडण्यात येत आहे. गावातला रस्ता खराब असल्याची तक्रार गावकऱ्यांनी वेळोवेळी केली. विद्यार्थ्यांनी तर चक्क मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शाळा सूटत असल्याची कैफियत मांडली होती. एबीपी माझानं विद्यार्थ्यांची ही समस्या जगासमोर मांडली आणि अवघ्या दोनच दिवसात प्रशासनाला बस सुरू करण्यास भाग पाडलं. बस सुरू झाल्यानं विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी एबीपी माझाचे आभार मानले.