अहमदनगर : भापकर गुरुजींनी बससेवा सुरु करण्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर आता पुन्हा गुंडेगाव ते पुणे बससेवा सुरु झाली आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील बातमी दाखवली होती.

काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील गुंडेगाव इथून पुण्याला जाणारी बस एसटी महामंडळाकडून बंद करण्यात आली होती. या विरोधात महाराष्ट्राचे मांझी अशी ओळख असलेल्या भापकर गुरुजींनी आंदोलनाचा इशारा देत वेळ पडल्यास आत्मदहन करेन असं सांगितलं होतं.

या संदर्भातली बातमी एबीपी माझानं दाखवली होती. यानंतर अखेर एसटी महामंडळाला जाग आली आहे. गुंडेगाव ते पुणे बससेवा आजपासून पुन्हा सुरु करण्यात आली. आज पहाटे सव्वा सहाच्या सुमाराप गुंडेगावमधून पुण्याकडे बस रवाना झाली.

कोण आहेत भापकर गुरुजी?

राजाराम भापकर गुरुजींचं वय वर्षे 88 आहे. त्यांनी आयुष्यभराची जमापुंजी खर्च करुन गुरुजींनी गावात रस्ते तयार केले. माझानं त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना माझा सन्मान पुरस्कारानं सन्मानित केलं.

महाराष्ट्राच्या या मांझीची ओळख ‘एबीपी माझा’ने जगाला करुन दिली होती.

संबंधित बातम्या

पुणे-गुंडेगाव बस सेवा बंद, भापकर गुरुजींचा आत्मदहनाचा इशारा

महाराष्ट्राच्या मांझीवर हल्ला, भापकर गुरुजींना गावगुंडांची मारहाण


महाराष्ट्राच्या मांझीचं यश, गुंडेवाडी ते पुणे थेट बससेवा