मुंबई : कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्याच्या भावनेमुळे राज्यभरात प्रवासात मोठी वाढ होणार आहे. महाराष्ट्रात दिवाळीदरम्यान सुमारे ५ लाख प्रवासी बसने प्रवास करतील असा अंदाज रेडबस या भारतातील सर्वांत मोठ्या ऑनलाइन बस तिकिटिंग प्लॅटफॉर्मवर आत्तापर्यंत झालेल्या आरक्षणांतून दिसत आहे. तसेच सर्व प्रवाशांना कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


वर्षातील सर्वाधिक प्रवासाच्या काळाची मागणी पूर्ण करण्यासाठी 435 खासगी बस ऑपरेटर्सनी महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) साथीने कंबर कसली आहे. सुमारे 10 हजार दैनंदिन फेऱ्या चालवल्या जात आहेत. या फेऱ्यांच्या माध्यमातून दिवाळीच्या आठवड्यात सुमारे पाच लाख प्रवाशांचे परिवहन होणे अपेक्षित आहे. या प्रवासाचे एकत्रित अंतर 5.0 कोटी किलोमीटर होईल असा अंदाज आहे. तसेच पुणे आणि नागपूर या शहरांदरम्यानचा मार्ग हा महाराष्ट्रात दिवाळीच्या काळातील सर्वाधिक मागणी असलेला मार्ग आहे.

सणासुदीच्या गर्दीतही सुरक्षिततेचा विचार प्राधान्याने केला जात आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले जात आहे. त्यांच्या सेफ्टी प्लस कार्यक्रमातील नियम बस ऑपरेटर्स व प्रवासी दोघांनाही लागू आहेत. त्यानुसार, सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना प्रवास करत असताना मास्क घालणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वाहनामध्येच हात निर्जुंतुक करण्याच्या सुविधा देणे आवश्यक आहे. बसमध्ये चढताना शरीराचे तापमान तपासले जाईल आणि ऑपरेटर्स चादरी वगैरे (लिनन) पुरवणार नाहीत. प्रत्येक फेरीनंतर प्रस्थापित नियमांनुसार बसेसचे निर्जंतुकीकरण केले जाईल.

आंतरशहर बस प्रवासासाठी वाढलेली मागणी सणासुदीच्या काळानंतरही टिकून राहणे अपेक्षित आहे. कारण, बसप्रवास हळुहळू पूर्वपदावर येत आहे.