सिंदखेडराजात जिजाऊंचा जन्मोत्सव, तीन राजे हजर राहणार!
एबीपी माझा वेब टीम | 12 Jan 2018 08:23 AM (IST)
या सोहळ्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती बाबाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
बुलडाणा: राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त बुलडाण्यातील सिंदखेड राजा इंथं आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पोवाडे, सामूहिक विवाहसोबत इतर सांस्कृतिक कार्यक्रमांची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती बाबाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रमुख उपस्थिती असेल. अरविंद केजरीवाल काल संध्याकाळी औरंगाबादेत दाखल झाले आहेत. याठिकाणी मोठा पोलिस फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. (सुरक्षेच्या कारणास्तव सुरवातीला केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र दोनदिवसापूर्वी केजरीवालांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे.