बुलडाण्यात मोबाईलसाठी दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, गळफास घेऊन आयुष्य संपवलं
एबीपी माझा वेब टीम | 22 Feb 2019 09:08 AM (IST)
हा मुलगा दहावीत शिकत होता. त्याने आई-वडिलांकडे मोबाईलसाठी तगादा लावला होता.
बुलडाणा : मोबाईल फोन घेऊन दिला नाही म्हणून एका अल्पवयीन वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना बुलडाण्यात घडली आहे. खामगाव तालुक्यातील पिंप्राळा इथे 20 फेब्रुवारीला दुपारी 15 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा मुलगा दहावीत शिकत होता. त्याने आई-वडिलांकडे मोबाईलसाठी तगादा लावला होता. परंतु परीक्षेचे दिवस जवळ आल्याने पालकांनी त्याची ही मागणी फेटळाली. त्यामुळे त्याने शेतातील निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. परंतु मोबाईलसारखे गॅझेट्स लहान मुलांच्या मनावर किती खोल परिणाम करतात, हे या घटनेवरुन दिसून येतं.