बुलडाणा : पित्याने पोटच्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतल्याचा प्रकार बुलडाण्यात समोर आला आहे. पिता विहिरीतून सुखरुप बाहेर आला, तर दोन्ही चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.


बुलडाण्यातील सुलतानपूरमध्ये होळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सणाला गालबोट लागलं. विष्णू काशीराम बडगे असं क्रूरकर्मा पित्याचं नाव आहे. 4 वर्षीय आकांक्षा आणि दीड वर्षांच्या सोहमचा मृत्यू झाला.

ही घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. संपूर्ण सुलतानपूर गावावर शोककळा पसरली आहे. मेहकर पोलिस अधिक तपास करत आहेत.