जळगाव : दोन हजाराची नोट घेऊन या सुट्टे पैसे घेऊन जा, जळगावच्या अॅग्रोवर्ल्ड या कृषी प्रदर्शनात लागलेला हा अनोखा स्टॉल. तब्बल 35 लाख रुपयांच्या सुट्ट्या पैशांचं कोणत्याही कमीशनशिवाय वितरण या स्टॉलवर वितरण होत आहे.


शेतकऱ्यांची तारांबळ दूर कऱण्यासाठी जळगावच्या 'देवा तुझा मी सोनार' संघटनेने हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

आधी पाचशे-हजारच्या नोटबंदीमुळे बाजारात गोंधळ उडाला आणि आता दोन हजाराच्या नव्या नोटेमुळे सुट्ट्या पैशांच्या प्रश्न उभा राहिला. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याला अडचणी येऊ लागल्या. सुट्ट्या पैशांची गरज ओळखून जळगावच्या सोनारांच्या संघटनेने हा उपक्रम सुरु केला.

सोनार संघटनेने आतापर्यंत तब्बल 35 लाख रुपये शेतकऱ्यांना वाटले आहेत. तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्याला अन्न आणि नोटाबंदीच्या काळात गरजूंना सुट्टे पैसे देण्यासारखं पुण्य नाही, आणि हेच पुण्य कमावून ही संघटना खरंच देवाचा सोनार ठरली आहे.