कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मिणचे गावाजवळील मोरेवाडी आणि म्हसवे गावांना जोडणारा पूल आज सकाळी कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या जिल्ह्यातच पूल कोसळल्याची घटना घडल्याने प्रशासनावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील मोरवाडी आणि म्हसवे या गावांना जोडण्यासाठी 1991 मध्ये हा पूल बांधण्यात आला. या पूलाची लांबी 12 मीटर असून, दोन्ही गावाच्या नागरिकांसाठी हा पूल महत्त्वाचा होता.

आज सकाळी 7 वाजता हा पूल कोसळला. सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या घटनेनंतर प्रशासनाविरोधात स्थानिकांकडून रोष व्यक्त होत आहे.

तसेच, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या जिल्ह्यात पूल कोसळल्याची घटना घडल्याने, प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.