नागपूर : 61 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर भीमसागर लोटला. दीक्षाभूमीवर सकाळपासून मोठी गर्दी आहे. अनुयायी इथल्या भव्य स्तुपात ठेवलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेत आहेत.


14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस विजयादशमीचा होता. तेव्हापासून विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. त्यामुळे दरवर्षी विजयादशमीला देशाच्या कानाकोपऱ्यातून बौद्ध बांधव दीक्षाभूमीवर एकवटतात.

संध्याकाळी धम्म प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज्य आणि केंद्र सरकारचे अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.